Raju Shetti: हुपरी पोलिसांची कारखानदारांवर मेहेरबानी ? कर्नाटकातील ऊस बंदोबस्तात महाराष्ट्रात आणण्याचा ठेका; शेट्टींचा आरोप

Swabhimani Shetkari Sanghatana: "...अन्यथा राज्याबाहेर गेल्यानंतर आम्हाला चोप द्यावा लागेल..."; राजू शेट्टी यांचा इशारा
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी पोलिसांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. कर्नाटक राज्यात जाऊन ऊस पोलिस बंदोबस्तात आणण्यासाठी हुपरी पोलिसांनी मेहेरबानी दाखवल्याचं समोर आलं आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांची परवानगी नसताना बेकायदेशीररित्या हुपरी पोलिसांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.

त्याबाबतची तक्रार राजू शेट्टी यांनी जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे फोनवरून केली आहे. त्याबाबत जिल्हा पोलिस प्रमुखांची प्रतिक्रिया विचारली असताना त्यांनी त्यावर बोलायला नकार दिला आहे.

जवाहर साखर कारखान्यासाठी ऊस आणण्यासाठी हुपरी पोलिस बंदोबस्तातील गाडी घेऊन कर्नाटक राज्यातील मांगनूर या ठिकाणी गेले असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समोर आणला आहे. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raju Shetti
Maratha Reservation: समजून घ्या, केवळ 'या' मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते

पोलिसांना राज्याबाहेर जाण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुखांची परवानगी घ्यावी लागते. ज्या राज्यात गेलेत तेथील स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन कारवाई करावी लागते. मात्र, हुपरी पोलिस राजरोसपणे कर्नाटक हद्दीत जातात. त्या ठिकाणाहून पोलिस बंदोबस्तात उसाची वाहने जवाहर कारखान्यास आणतात. हे बेकायदेशीर असून, पोलिसांनी कारखान्याचा ठेका घेतल्याचे काम सुरू केलेले आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करून, पोलिस सुपारी घेऊन काम करतात, असे चित्र समाजासमोर येणे हे वाईट आहे. त्यामुळे या पोलिसांना रोखावे, अन्यथा राज्याबाहेर गेल्यानंतर पोलिससुद्धा सामान्य आहेत, असे समजून त्यांना आम्हाला चोप द्यावा लागेल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

दरम्यान, या प्रकाराबाबत जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनात व्यस्त असून, यावर बोलण्यास नकार दिला.

Edited By- Ganesh Thombare

Raju Shetti
Contract Recruitment : मोठी बातमी ! कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द; नऊ कंपन्यांनाही दणका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com