Contract Recruitment : मोठी बातमी ! कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द; नऊ कंपन्यांनाही दणका

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar: राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मंगळवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar:
Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar:Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी भरतीच्या मुद्यांवरून जोरदार राजकारण तापलं होतं. विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. यानंतर अखेर कंत्राटी भरतीचा शासन निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची मंगळवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कंत्राटी भरतीच्या प्रश्नावरून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलने देखील झाली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कंत्राटी भरतीचा शासन निर्णय आम्ही रद्द करण्याची घोषणा केली होती. यानंतर अखेर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करत याबाबत आता नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar:
Rajasthan Election : राजस्थान निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर

याबरोबरच येत्या 9 महिन्यात टप्प्याटप्प्याने कंत्राटी पदांच्या सेवा संपुष्टात आणण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. तसेच राज्य सरकारने नव्याने जारी केलेल्या जीआरमध्ये जुन्या एजन्सींना जोरदार दणका देण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या 9 कंपन्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे.

काही दिवासांपू्र्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कंत्राटी भरतीचा शासन निर्णय हा उद्धव ठाकरेंच्या सरकारमधला असल्याचा आरोप केला होता. तसेच मागील सरकारच्या पापाचे ओझे आमचे सरकार उचलणार नाही, म्हणून कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.

Edited By- Ganesh Thombare

Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar:
Maratha Reservation: नगरमध्येही मंत्री, आमदार, खासदारांच्या घरासह पक्ष कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com