Solapur Madha News: राज्यात सध्या उसाच्या एफआरपीचा प्रश्न चांगलाच तापला आहे. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या ऊसदर आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही, तर सोलापूर जिल्ह्यात उसाच्या दरावरून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण पाहायला मिळत आहे. अभिजित पाटील यांनी आमदार बबनराव शिंदे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे.
"माझ्यामुळे आमदार शिंदेंना ऊसदर वाढवावा लागला. सगळ्यात पहिल्यांदा ऊसदराची कोंडी सोलापूर जिल्ह्यामध्ये मी फोडली आणि मी ऊसदर 2,550 जाहीर केल्यामुळे यांना एका रात्रीत 2700 रुपये दर जाहीर करावा लागला. म्हणजे यांची दोनशे रुपये दर जास्त द्यायची तयारी होती, परंतु इच्छाशक्ती नव्हती, मग दोनशे रुपये दर तुम्ही जास्त देऊ शकत होतात, तर इतक्या दिवस का दिला नाही ?", असा सवाल आमदार बबनराव शिंदे यांचे नाव न घेता अभिजित पाटलांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अभिजित पाटील कापसेवाडी येथील शरद पवार यांच्या सभेमध्ये बोलत असताना माढा तालुक्याच्या नेतृत्वावरती खरमरीत टीका करीत तालुक्यामध्ये आजपर्यंत कोणता विकास झाला ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एका गावामध्ये जर 500 इंजिनियर पडून असतील, तर या तालुक्यांमध्ये एकही शिक्षण संस्था किंवा एकही मोठी औद्योगिक वसाहत का निर्माण झाली नाही? तालुक्यात मोठ्या शिक्षण संस्था नाहीत, मग विकास कोणाचा झाला ? असे सवाल अभिजित पाटील यांनी उपस्थित केले.
दरम्यान, अभिजित पाटलांची गेल्या अनेक दिवसांपासून आमदार शिंदे यांच्यावरती होत असलेली टीका ही माढा मतदारसंघामध्ये लक्षवेधी ठरत आहे, तर या वेळी ऊस मोजणीच्या काट्यावरही त्यांनी भाष्य केले.
"सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मी कारखानदार आहे की, कारखान्यावरती ऊस घालायला येणारा ट्रॅक्टर कुठेही काटा करून आला तरी मला अडचण नाही, असं सांगणारा सोलापूर जिल्ह्यामध्ये मी पहिला कारखानदार आहे. मला शेतकऱ्यांनी निवडून दिले, त्यामुळे शेतकऱ्यांशी बेमानी आपल्या रक्तात नाही", असेही अभिजित पाटील म्हणाले.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.