Maan News : जयकुमार गोरेंची सूचना; मायणी भागाला तारळीतून मिळणार जादा पाणी

Jaykumar Gore दहिवडी (ता. माण) येथे सिंचन विभाग अधिकाऱ्यांच्या बैठकीत तारळी योजनेच्या वाढीव आवर्तनाबाबत आमदार जयकुमार गोरे यांनी सूचना केल्या.
Jaykumar Gore In Irrigation Meeting
Jaykumar Gore In Irrigation Meetingsarkarnama

-विशाल गुंजवटे

Maan News : तारळी योजनेच्या आवर्तनाचा कालावधी संपला असला तरी मायणी परिसरातील गावांच्या खरीप हंगाम आणि टंचाईचा विचार करता आवर्तन कालावधी वाढविण्यात आला आहे. अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत तसा निर्णय घेऊन उद्या (बुधवार) पासून या भागाला तारळीचे पाणी देण्यात येणार असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.

दहिवडी (ता. माण) येथील विश्रामगृहात सिंचन विभागाच्या Irrigation Department अधिकाऱ्यांच्या समवेत आमदार जयकुमार गोरे Jaykumar Gore यांनी बैठक घेतली. या बैठकीला अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता अमर काशिद, अमोल निकम, प्रगती यादव, राहुल घनवट, उपविभागीय अभियंता सोमेश्वर जरे इंगुळकर, रोहन देसाई, अभिजीत कर्पे उपस्थित होते.

जयकुमार गोरे म्हणाले, उरमोडी, टेंभू आणि तारळी योजनेतून खटाव आणि माण तालुक्यातील लाभक्षेत्रात खरीप हंगामासाठी आटोकाट प्रयत्न करून पाणी उपलब्ध करण्यात आले. आपल्याकडे या वर्षी पाऊसच नसल्याने प्रत्येक योजनेची आवर्तने वाढवून घ्यावी लागली.

सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून तसेच मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करून गरज असेल तेथे पाण्याची आवर्तने वाढवून घेतली. मायणी परिसरात मुदत संपूनही तारळीचे आवर्तन वाढविण्यासाठी बैठक घेण्यात आली. या भागातील टंचाई ध्यानात घेता उद्यापासून (ता.२०) वाढीव आवर्तनाचे पाणी सोडण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्या (ता. २०) पासून मोराळे, गुंडेवाडी शिव, मायणी, वाघमोडी तलाव, माळीनगर, खडकाचा मळा, अनफळे येथे आवर्तन सुरू करत असून, या भागातील टंचाई ध्यानात घेता हे वाढीव आवर्तनाचे पाणी सोडण्यात येत असल्याचे गोरे यांनी सांगितले.

Edited By Umesh Bambare

Jaykumar Gore In Irrigation Meeting
Satara News : शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं साताऱ्यात आणणार : शिवेंद्रराजे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com