
Kolhapur News : नुकताच सांगली येथे एका कार्यक्रमासाठी आलेले भाजप मंत्री नितेश राणे यांनी विशाळगडावर उरूस भरतोच कसा असा इशारा दिला होता. तसेच त्यांनी विरोधकांवर सडकून टीका करताना ईव्हीएमचा नवा अर्थ सांगत एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं होतं.
यानंतर प्रशासनाने गडावरील हजरत पीर मलिक रेहान बाबांच्या उरूसाला परवानगी नाकारली. तर तेथे पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी, हिंदू-मुस्लिमांचे ध्रुवीकरण करण्यासाठी छत्रपतींची चुकीची प्रतिमा उभारली जातेय असा इशारा दिला आहे. ते रविवारी (ता.12) विशाळगडावर भेट देण्यासाठी आले असताना बोलत होते.
यावेळी सुजात आंबेडकर यांनी सामाजिक सलोख्याचा संदेश जपण्यासाठी आपण गडाला भेट दिल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह येथील हजरत पीर मलिक रेहान बाबांच्या दर्ग्यामध्ये भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांचे गजापूर, बौद्धवाडी आणि गडावर स्वागत करण्यात आले.
यानंतर ते म्हणाले, ‘स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जात आहे. दोन जातींमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पर्यटक, भाविक, इतिहासप्रेमी यांच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध न येता हा ऐतिहासिक गड उघडा राहायला पाहिजे.
हिंदू-मुस्लिमांचे ध्रुवीकरण करण्यासाठी छत्रपतींची चुकीची प्रतिमा उभारली जात आहे. गडाची देखभाल करणाऱ्यांना आज त्रास दिला जातोय, ते चुकीचे आहे. तो छत्रपतींचा अवमान आहे.
दरम्यान पोलिस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाळगड व गजापूर परिसरात सहा पोलिस अधिकारी व सत्तर पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. सकाळी दहा ते पाच या वेळेत आज उरुसाच्या पहिल्या दिवशी सुमारे दोन हजार भाविक व पर्यटकांनी हजेरी लावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.