Sujay Vikhe on Mahavikas Aghadi : भावी मुख्यमंत्री 'भावी'च राहणार..खा.सुजय विखेंनी महविकासआघाडी'ला डिवचलं

Nagar Politics: राज्यभरात ठिकठिकाणी भावी मुख्यमंत्रीपदाच्या पोस्टरबाजीवर विखे पाटील यांनी निशाणा साधला आहे
Sujay Vikhe on Mavikas Aghadi :
Sujay Vikhe on Mavikas Aghadi :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahmednagar Politics : 2024 विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडून विविध नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री म्हणून आपल्या नेत्यांच्या केलेल्या होर्डिंग बाजीवर भाजप खासदार सुजय विखे ( MP Sujay Vikhe) यांनी मार्मिक टीका केली आहे.

ज्या नेत्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा आहे ते निवृत्तीपर्यंत भावीच राहणार असून आम्ही आजी आहोत आणि जनतेच्या आशीर्वादाने भविष्यातही आजी'च राहणार आहोत असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी अहमदनगर येथे पक्षाच्या कार्यक्रमाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. (Ahmednagar Politics)

Sujay Vikhe on Mavikas Aghadi :
KCR On Maharashtra Tour : पुष्पवृष्टीची परवानगी नाकारली; 'केसीआर' एकटेच घेणार दर्शन, 'असा' असणार दिनक्रम

मागील वर्षी(2022) याच जून महिन्यात शिवसेनेतून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट चाळीस आमदारांसह बाहेर पडला आणि त्यांनी भाजपासोबत जात राज्यांमध्ये सत्तापालट केला. मात्र यानंतर एकूणच राज्यातील वातावरण संघर्षमय झालेल्या अशा परस्थितीत महाविकास आघाडीच्या बाजूने विशेष करून शिवसेना ठाकरे गटाच्या बाजूने सहानुभूतीची लाट असल्याचे बोलले जात आहे. त्यातच गेल्या 25 वर्षांपासून राज्यात स्वतःची ओळख निर्माण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री आतापर्यंत होऊ न शकल्याबद्दल नुकत्याच झालेल्या पक्षाच्या वर्धापन मिळवाव्यामध्ये मोठी चर्चा झाली.

त्या अनुषंगाने 2024 मध्ये राज्यामध्ये भाजप आणि शिंदे शिवसेना गटाला पराभवाला सामोरे जावे लागून महाविकास आघाडी पुन्हा एकदा सत्तेत येईल असा होरा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांमध्ये आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून जणू स्पर्धा सुरू असल्याचे एकंदरीत चित्र आहे.

Sujay Vikhe on Mavikas Aghadi :
Eknath Shinde On Hoardings : नेत्यांच्या चमकोगिरीवर मुख्यमंत्री शिंदेंची नाराजी; म्हणाले, 'वारकऱ्यांच्या स्वागताचे..'

या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे यांना विचारले असता, जे भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत येत आहेत त्यांच्या निवृत्तीपर्यंत ये भावीच राहणार आहेत. आमच्याकडून त्यांना शुभेच्छा असतील. कारण त्यांच्या पक्षांमधील आमदारांची संख्या पाहता जेवढे आमदार आहेत तेवढेच भावी मुख्यमंत्री म्हणून इच्छुक आहेत. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना सरकारला त्यांच्या कामाची पावती दिलेली आहे आणि भविष्यात पण देणार आहे. त्यामुळे आम्ही भावीच्या स्पर्धेत नसून सध्या आजी आहोत आणि भविष्यातही जनतेच्या विश्वासाने आजीच राहणार आहोत असा विश्वास खा.विखे यांनी व्यक्त केला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.