Sujay Vikhe News : सुजय विखेंनी वाढवले निलेश लंकेंचे टेन्शन; पारनेरमधील फोन करणारा कोण?

Ahmednagar Politics : येणारी विधानसभा आणि नगर दक्षिण लोकसभा निवडणूक ही विखे पिता-पुत्रांसाठी महत्वाची असणार आहे.
Mp Sujay Vikhe Patil
Mp Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar Politics News : येणारी विधानसभा आणि नगर दक्षिण लोकसभा निवडणूक ही विखे पिता-पुत्रांसाठी महत्वाची असणार आहे. भाजपाच्याच राम शिंदेसह इतर उमेदवारांनी 2019 ला झालेल्या पराभवाचा रोख विखेंकडे वळवला होता. त्यातच नगर दक्षिण लोकसभेसाठी आमदार राम शिंदे यांनी उमेदवारीची जाहीर रित्या मागणी केलेली.

या पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे यांना पत्रकारांनी विविध विषयावर प्रश्न विचारले. यावर आपणही या सर्व निवडणुकांच्या मैदानात आहोत असे सूचकपणे सांगितले. लोकसभेच्या उमेदवरीबद्दल तसेच इतर पक्षातील आजी-माजी आमदार विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या संपर्कात असतात. यावर विचारले असता खासदार विखे म्हणाले, राजकारणात माझे अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, वेळ आल्यावर यावर बोलता येईल.

Mp Sujay Vikhe Patil
BRS Nagpur News : उपराजधानीत बीआरएसचा पहिला दणका राष्ट्रवादीला !

"जब दोस्ती को रिश्तेदारी मे बदलनेका वक्त आयेगा तब दोस्ती को रिश्तेदारी में बदलेंगे. तब तक दोस्ती चलने दो", सध्या दोस्ती चालू आहे ती अशीच चालू द्या, असे माध्यमांना सांगितले. जिल्ह्यात आपल्या संपर्कात किती आजी-माजी आमदार आहेत, असे विचारल्यानंतर आत्ताच मला पारनेर मधून एक फोन येऊन गेला. मात्र, माध्यमसमोर असल्यामुळे मी बोललो नाही. वेळ आल्यावर याबद्दल सर्व काही बोलेल असे संकेत विखे यांनी यावेळी दिले.

त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभेसाठी नगर दक्षिणेतून भाजपच्या (BJP) उमेदवारीबद्दल शिंदे (Ram Shinde) यांनी केलेल्या मागणीवरून लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल असे विचारले असता विखे म्हणाले, हा पक्षाचा अधिकार असून वेळ आल्यावर पक्ष जो निर्णय घेईल त्या पद्धतीने तो मानला जाईल. मी पक्षाचा साधा कार्यकर्ता असून पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य करू. मात्र, त्यासाठी अजून बराच वेळ आहे असेही त्यांनी सांगितले.

Mp Sujay Vikhe Patil
Nagpur Congress News : राष्ट्रवादी काॅंग्रेस सतत तीन वेळा अपयशी, हिंगण्यावर कॉंग्रेसने ठोकला दावा !

गणेश सहकारी साखर कारखान्यात विखे पॅनलचा झालेल्या दारुण पराभवाबद्दल खासदार सुजय विखे यांना विचारले असता त्यांनी सहकारामध्ये सभासद हे महत्त्वाचे घटक असतात आणि सत्तेमध्ये कोणाला निवडून द्यायचे हे तेच ठरवत असतात. मुळात गणेश साखर कारखाना जवळपास 25 वर्ष आमच्या विरोधकांच्या (कोल्हे गटाच्या) ताब्यात होता. तो मध्यन्तरी बंद पडल्याने भाडेतत्त्वावर आम्ही तो चालवायला घेतला. त्यावेळी सभासदांनीही जर आम्ही तो चालवायला घेतला म्हणून सत्ता आमच्याकडे दिली.

मात्र, आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा सभासदांना जर वाटले असेल की पुन्हा एकदा सत्ताविरोधकांच्या (कोल्हे गटाच्या) ताब्यात दिला. याबद्दल विशेष वाटण्यासारखे काहीच नाही. मुळात हा कारखाना आमच्या विरोधकांची गेली 25 वर्ष त्यावर त्यांची सत्ता होती. त्यामुळे विखे परिवाराला या पराभवाने मोठा धक्का बसला असे मुळीच नाही. या बातम्या माध्यमात दाखवले जात आहेत. त्यात तथ्य नसल्याचे विखे यांनी सांगितले. जर प्रवरा सहकारी साखर कारखान्यात सत्ता परिवर्तन झाले असते तर ती मोठी बातमी होईल. गणेश साखर कारखान्याबाबत असे काही येत नाही असे विखे यांनी यावेळी स्पष्ट केले.

जिल्हा विभाजनाबाबत सुजय विखे यांनी, आपला व्यक्तिगत जिल्हा विभाजनास विरोध असल्याचे सांगत जिल्ह्याचा केवळ विभाजन करून विकास होत नसतो. जिल्ह्यामधील तलाठी ग्रामसेवक आदींच्या जागा भरण्याचे काम राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करत आहेत. या सर्व जागा भरल्यानंतर नागरिकांची काम जर वेळेत आणि गतिमान होणार असेल, तर जिल्हा विभाजन करायचे तरी कशासाठी असा प्रश्न आहे.

Mp Sujay Vikhe Patil
Ajit Pawar News : मोठी बातमी : अजित पवार म्हणाले, विरोधी पक्षनेतेपद नको; पक्ष संघटनेत जबाबदारी द्या!

मुळात जिल्हा विभाजनाचा खर्च हा सरकारवर मोठा असतो. तोच पैसा जिल्ह्यातील रोजगार इतर विकास कामांसाठी वापरला तर जिल्ह्याचा अधिक विकास होईल. कदाचित काही आजी-माजी आमदारांना जिल्हा विभाजन करावे असे वाटत असेल. मात्र, हा त्यांचा पण माझ्यासारखा व्यक्तिगत विषय आहे. भारतीय जनता पक्षाने अधिकृत अशी कोणतीही भूमिका याबाबत अद्याप घेतलेली नसल्याने मी माझे केवळ व्यक्तिगत मत याबद्दल व्यक्त करतोय असे विखे म्हणाले.

सुजय विखे हे अनेकदा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, नगरचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार संग्राम जगताप यांच्या सोबत एकत्र आल्यानंतर या संदर्भातील बातम्या चर्चेत राहिल्या. त्यांची सोबतची छायाचित्रे चांगलीच व्हायरल झाली. पारनेरमधेही सुजय विखे रस घेताना दिसतात. आमदार लंके आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यातील टोकदार टीका टिप्पणी सध्या चर्चेत आहे. लंके लोकसभेसाठी राष्ट्रवादी कडून प्रबळ दावेदार आहेत. या पार्श्वभूमीवर लंके यांना शह देण्याची तयारी होत असल्याचे बोलले जात आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com