

भाजपने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात हालचाली वाढवत काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्याशी युतीची चाचपणी केल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी वंचित बहुजन आघाडीशी युतीसाठी संपर्क साधल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी उघड केली आहे.
Solapur, 25 December : भाजपने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती होणार नाही, हे जाहीर केल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसे संकेत आणि विधाने दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलेले आहेत.
मात्र, दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची चर्चा सुरू असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याला फोन केल्याचे पुढे आले आहे, त्याबाबत खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच माहिती दिली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. सत्ताधारी महायुतीमधील शिवसेना आणि भाजपने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस मात्र सोबत असणार नाही, असे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.
तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची चर्चा झाल्याची माहिती आहे, त्यामुळे राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय हा चर्चेतून झाले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत न जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवस पुण्यात तळ ठोकला. अनेकांच्या मुलाखती घेतल्या. तसेच, अनेक माजी नगरसेविकांचे राष्ट्रवादीत प्रवेश करून घेतला आहे. तसेच त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष (NCP SP) आणि काँग्रेससोबत युतीची चाचपणी केल्याचे दिसून येत आहे.
खुद्द अजित पवार यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांना फोन केल्याचे पुढे आले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत युती करण्याचे संकेत राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी दिले आहेत. तशी तयारीही सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळेच पवारांचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कारण त्यांचा अजितदादांसोबत जाण्याच्या निर्णयास विरोध आहे.
एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच राज्यात मोठी घडामोड घडल्याचे पुढे आले आहे. त्याबाबत खुद्द वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीच माहिती दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी वंचित बहुजन आघाडीला युतीसाठी फोन केल्याचे पुढे आले आहे. वंचित आघाडीच्या नेत्यांसोबत त्यांची चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे.
आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अरविंद तायडे यांना सुप्रिया सुळे यांचा फोन आलेला होता. त्यांची प्राथमिक चर्चा झाली, आघाडीसोबत त्यांची बैठक होईल, त्यानंतर जे होईल, ते मला आज संध्याकाळपर्यंत कळेल.
प्र.1: भाजपने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत युतीबाबत काय निर्णय घेतला?
उ: भाजपने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
प्र.2: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा का सुरू आहे?
उ: भाजपने युती नाकारल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहेत.
प्र.3: अजित पवार यांनी कोणाशी युतीबाबत संपर्क साधल्याचे समोर आले आहे?
उ: अजित पवार यांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधल्याचे समोर आले आहे.
प्र.4: वंचित बहुजन आघाडीशी युतीसाठी कोणी फोन केला?
उ: खासदार सुप्रिया सुळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांशी युतीसाठी संपर्क साधला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.