Devyani Pharande : देवयानी फरांदेंनी उठवलं रान ; यतीन वाघ, विनायक पांडे अन् शाहू खैरेंच्या भाजप प्रवेशाला कडाडून विरोध

Devyani Pharande opposes BJP entry of Yatin Wagh, Vinayak Pandey and Shahu Khaire : भाजप महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये ऑपरेशन लोटस राबवत आहे. मात्र भाजपच्याच आमदार देवयानी फरांदे यांचा त्यास विरोध आहे.
Devyani Pharande opposes BJP entry of Yatin Wagh, Vinayak Pandey and Shahu Khaire
Devyani Farande, Girish Mahajan, Yatin Wagh, Vinayak PandeySarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : नाशिक महानगरपालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात काही महत्त्वाच्या नेत्यांचे पक्षप्रवेश आज नाशिकमध्ये पार पडत आहे. यामध्ये राज ठाकरेंचे माजी महापौर यतीन वाघ आणि उद्धव ठाकरेंचे माजी महापौर विनायक पांडे तसेच कॉंग्रेसचे शाहू खैरे हे आज भाजपत प्रवेश करत आहे.

परंतु या पक्षप्रेवशाला भाजपच्या मध्य विधानसभा मतदारसघांच्या आमदार व निवडणूक प्रमुख असलेल्या देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला आहे. फरांदे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट लिहून आज होत असलेल्या पक्षप्रवेशाला विरोध दर्शवला आहे.

प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही. जय श्री राम अशी पोस्ट आमदार फरांदे यांनी केली आहे.

Devyani Pharande opposes BJP entry of Yatin Wagh, Vinayak Pandey and Shahu Khaire
Nashik Politics : नाशिकध्ये ठाकरे बंधूंना भाजकडून मोठा धक्का, ठाकरेंच्या दोन माजी महापौरांना लावलं गळाला

परंतु गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा पक्षप्रवेश आजच होत आहे. मात्र विरोधात देवयांनी फरांदे यांनी मोठे रान उठवले आहे. देवयानी फरांदे यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी या पक्ष प्रवेशाला विरोध करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. तसेच फरांदेंच्या कार्यालयाबाहेर पोलिसही दाखल झाले आहेत. हा विरोध पाहाता आमदार देवयानी फरांदे यांची अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.

Devyani Pharande opposes BJP entry of Yatin Wagh, Vinayak Pandey and Shahu Khaire
Yatin Kadam : निफाडमध्ये यतीन कदम नावाच्या नव्या नेतृत्वाचा उदय, आजी-माजी आमदार अस्वस्थ

निवडणूक प्रमुख असतानाही मला या पक्षप्रवेशाबाबत विचारणा करण्यात आली नाही असं देवयानी फरांदे यांची तक्रार आहे. परंतु यतीन वाघ व विनायक पांडे व शाहू खैरे हे तिघेही सक्षम नेते असल्याने भविष्यात देवयानी फरांदे यांना त्यांच्या मतदारसंघात अस्तित्वाची भीती असल्याने हा विरोध होत असावा असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. दरम्यान आता मंत्री गिरीश महाजन हे फरांदे यांची समजूत कशी काढतात हे पाहावे लागणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com