Solapur, 18 November : सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात एका वकिलाला पैसे वाटप करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहाथ पकडले. त्याबाबतचा व्हिडिओही सोशल माध्यमांतून व्हायरला झाला आहे. ही घटना रविवारी (ता.१८ नोव्हेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास जुने विडी घरकुल परिसरातील राज मेमोरियल शाळेसमोरील गोकुळ नगर भागात घडली आहे. या प्रकरणी संबंधित वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैसे वाटप प्रकरणी ॲड. रोहन सुनील सोमा (वय २८, रा. जुने विडी घरकुल, सोलापूर Solapur) असे गुन्हा दाखल झालेल्या वकिलाचे नाव आहे. ठाणे अंमलदार अजित माने यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. ॲड. रोहन सोमा हे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या एका मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले जात आहे.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात (Solapur City North Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महेश कोठे, तर भारतीय जनता पक्षाकडून माजी मंत्री, आमदार विजयकुमार देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी ह्या पक्षाचा राजीनामा देऊन निवडणूक लढवत आहेत. भाजपमधील (BJP) बंडखोरी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रथमच रंगतदार बनली आहे, त्यामुळे निकालाची प्रचंड उत्सुकता आहे
जुने विडी घरकुल परिसरातील राज मोमोरियल शाळेसमोरील गोकुळ नगरमध्ये एका अंधाऱ्या खोली पैसे वाटप सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी आले, त्या वेळी रोहन सोमा यांच्याकडे एक पाकीट आणि त्या पाकिटात पाचशे रुपयांच्या नोटा आढळून आल्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याबाबतचा व्हिडिओ काढला, त्या वेळी प्रचंड गोंधळ झाला.
याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्या वेळी पोलिसांना रोहन सोमा यांच्याकडे ८० हजार रुपये असलेले पाकिट आढळून आले. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल माध्यमांतून मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. प्रचार संपण्याच्या एक दिवस अगोदरच पैसे वाटप करताना एका वकिलाला पकडण्यात आल्याने सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे.
पैसे वाटप करताना एका वकिलाला पकडण्यात आल्यानंतर सोलापुरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलिस निरीक्षक विजय खोमणे, सहायक पोलिस निरीक्षक भरत चंदनशिव आणि गणेश इंगळे यांनी रविवारी मध्यरात्री घटनास्थळी भेट दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.