Ambedkar on Shinde : लोकसभा निवडणुकीनंतर प्रणितींसह सुशीलकुमार शिंदे भाजपत जाणार; आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Solapur Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्यानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांच्या सभेसाठी ॲड. आंबेडकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सोलापूरमध्ये सभा घेतली.
Prakash AmbedKar-Praniti Shinde-Sushilkumar shinde
Prakash AmbedKar-Praniti Shinde-Sushilkumar shindeSarkarnama

Solapur, 3 May : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे निवडणुकीनंतर आपल्या परिवारासह भारतीय जनता पक्षात सामील होतील. त्यांना आपली संपत्ती वाचवायची आहे, त्यामुळे चौकशी टाळण्यासाठी ते भाजपत जातील. त्यांना संविधान बदलाशी काहीही देणंघेणं नाही, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अधिकृत उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्यानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांना पाठिंबा दिला आहे.

त्यांच्या सभेसाठी ॲड. आंबेडकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सोलापूरमध्ये सभा घेतली. त्या सभेत आंबेडकर यांनी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) आणि सुशीलकुमार शिंदे हे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये जातील, असा गौप्यस्फोट केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Prakash AmbedKar-Praniti Shinde-Sushilkumar shinde
Sule Vs Pawar : धमक्या देणाऱ्यांना सांगा, विधानसभा फार लांब नाही; सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ललकारले

भाजपमध्ये प्रवेश करणारी काँग्रेसमधील अनेक नावे आली हेाती. त्या अनेक नावांमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचेही नाव होते. मात्र, त्यांची चौकशी सध्या थांबलेली आहे. ती पुन्हा सुरू होऊ नये, यासाठी सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) हे भारतीय जनता पक्षात जातील, अशी माझी माहिती आहे.

सुशीलकुमार शिंदे यांना संविधान बदलेल आणि अन्य कामांसंदर्भात काहीही देणं घेणं नाही. शिंदे यांनी जी काही माया जमवली आहे, ती वाचविणे, हेच त्यांचे आणि संपूर्ण काँग्रेसवाल्यांचे टार्गेट आहे. हे त्यांचं नवं नाही, ते सर्व जुनचं आहे, असा दावाही आंबेडकर यांनी केला.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत एका उमेदवाराने आपली मालमत्ता आणि केसेसाबाबत काहीही माहिती दिलेली नाही. देशातील आणि विदेशातील प्रॉपर्टीही त्यांनी दाखवलेली नाही. त्याची चौकशी तर होईलच ना. जेव्हा चौकशी होईल, तेव्हा स्वतःला वाचवणार की मतदारांना वाचवणार. तर ते स्वतःला वाचवतील.

Prakash AmbedKar-Praniti Shinde-Sushilkumar shinde
Prakash Ambedkar Sabha : राजकारणी, कारखानदारांवर छापे टाकून झाले, आता व्यापाऱ्यांचा नंबर; आंबेडकरांनी व्यक्त केली भीती

काही वर्षापूर्वी मध्य प्रदेशातील पाच तरुणांना पकडून नेण्यात आले होते. तेव्हा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. काही दिवसांनी त्यांचे मृतदेह मिळाले. त्याची साधी चौकशीदेखील झाली नाही. जे लोक तुमची सुरक्षा करू शकत नाहीत, त्यांच्या मागे धावाल, तर पश्चातापाशिवाय हाती काहीही लागणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

मागील निवडणुकीच्या तुलनेत या वेळी वंचित बहुजन आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पक्षाचाही फरफॉर्मन्सही चांगला आहे. त्यामुळे या निवडणुकीत वंचितला लोकमान्यता मिळून आमचे खाते उघडले जाईल, असा विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी बोलून दाखवला.

Prakash AmbedKar-Praniti Shinde-Sushilkumar shinde
Abhijeet Patil : ‘माझी राजकीय महत्वकांक्षा बाजूला ठेवून मी सभासदांच्या हिताचा निर्णय घेतला’; अभिजित पाटलांची खंत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com