Latur Lok Sabha Constituency : लातूर पॅटर्नला भंगार म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भंगारात टाकण्याची वेळ; नाना पटोले संतापले...

Loksabha Election 2024 : मागील निवडणुकीत मराठा, धनगर समाजाला आरक्षण देतो, केंद्रात व राज्यामध्ये भाजपला सत्ता द्या, असं फडणवीस म्हणाले होते. तुम्ही एकहाती सत्ताही त्यांना दिली, पण मिळाले का आरक्षण? केवळ मतांसाठी मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचे पाप त्यांनी केले. आतातरी लक्षात ठेवा ते फडणवीस नव्हे; तर फसणवीस आहेत, असा टोला पटोले यांनी लगावला.
Nana Patole-Devendra Fadnavis
Nana Patole-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Latur, 2 May : केवळ महाराष्ट्रातच नाही; तर देशात शिक्षणासाठी ज्या लातूर पॅटर्नचे गौरवाने नाव घेतले जाते, त्या पॅटर्नला राज्याचे मुख्यमंत्री भंगार पॅटर्न म्हणतात. मला वाटतं आता यांनाच भंगारात टाकण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी महायुतीवर टीका केली. केवळ मतांच्या राजकारणासाठी भाजपने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद आणि संघर्ष निर्माण करण्याचे पाप केले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे फसणवीस आहेत, असा हल्लाही पटोले (Nana Patole) यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार डाॅ. शिवाजी काळगे (Dr. Shivaji Kalge) हे दोन लाख मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मागील निवडणुकीत मराठा, धनगर समाजाला आरक्षण देतो, केंद्रात व राज्यामध्ये भाजपला सत्ता द्या, असं फडणवीस म्हणाले होते. तुम्ही एकहाती सत्ताही त्यांना दिली, पण मिळाले का आरक्षण? केवळ मतांसाठी मराठा ओबीसी वाद निर्माण करण्याचे पाप त्यांनी केले. आतातरी लक्षात ठेवा ते फडणवीस नव्हे; तर फसणवीस आहेत, असा टोला पटोले यांनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole-Devendra Fadnavis
Lok Sabha Election 2024 : 'शरद पवार- उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक'; बावनकुळेंनी डिवचलं!

शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी अहमदपूर, निलंगा, चाकूर येथे सभा झाल्या. या वेळी केलेल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात लातूर पॅटर्नला भंगार पॅटर्न म्हणून संबोधल्याबद्दल आता यांना भंगारात टाकण्याची वेळ आली आहे, अशी टीका पटोले यांनी केली. अमित देशमुख यांनी त्यांच्या भाषणात विजय काळगे यांचा विजय दोन लाखांच्या मताधिक्याने होणार असल्याचे सांगितले.

पण मी यापुढे जाऊन सांगतो की, ते दोन नाही, तर पाच लाख मताधिक्याने निवडून येणार आहेत. महाराष्ट्रातही सध्या भाजपच्या विरोधात लाट असून लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली आहे.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच जागा निवडून येतील, असा दावा पटोले यांनी केला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थिक धोरण बदलण्याचे पाप भाजप सरकारने केले असून जीएसटी आणून अदानी, अंबानींच्या घरापर्यंत पैसे पुरवण्याचे काम केले.

Nana Patole-Devendra Fadnavis
Sharad Pawar News : भाजपशी संधान बांधलेल्या अभिजित पाटलांवर पहिल्यांदाच बोलले शरद पवार; राज्यकर्त्यांना फटकारलं

महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातला पळवून नेण्याचे काम भाजपने केले आहे. कांदा उत्पादक शेतकरी संपूर्ण देशात असातांना केवळ गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यातीस परवानगी दिली. त्यामुळे पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत की, गुजरातचे हेच कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोदीच्या सभेला तीन हजार रुपये देऊन माणसं आणली, कोरोना लसीमुळे अनेक गंभीर आजार वाढले असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, विनायकराव पाटील, आमदार डॉ. वाजाहदजी मिर्झा यांनी आपल्या भाषणातून राज्यातील महायुती व केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका केली.

Nana Patole-Devendra Fadnavis
Dhangekar and Bagul : धंगेकरांनी घेतली आबांची भेट, आता एका दिलाने काम करणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com