Mangalvedha Politics : स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी पश्चिम महाराष्ट्राच्या माजी अध्यक्षांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Assembly Election 2024 : राहुल घुले हे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील नवीन संघटनेचे काम करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र प्रणिती शिंदे यांच्या आज झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
Rahul Ghule joins Congress
Rahul Ghule joins CongressSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 06 November : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना पश्चिम महाराष्ट्रात धक्का बसला असून संघटनेच्या युवा आघाडीच्या प्रमुखांनी ऐन विधानसभा निवडणुकीत साथ सोडली आहे. शेट्टी यांच्यापासून फारकत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष ॲड. राहुल घुले यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्याचा फायदा काँग्रेसचे पंढरपूरचे उमेदवार भगीरथ भालके यांना होऊ शकतो.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे (Pandharpur Assembly Constituency) काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारानिमित्त माचनूर (ता. मंगळवेढा) येथे खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्या सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा उसदराचा, पिकविम्याचा, दुष्काळ निधी, म्हैसाळ पाणीप्रश्न, उजनी पाणीप्रश्नावर ॲड राहुल घुले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने आंदोलन केली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी कायम पुढाकाराची भूमिका घेत न्याय देण्याची भूमिका बजावली आहे.

यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, पंढरपूर पोटनिवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याने घुले यांच्यावर कारवाई केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून संघटनेशी त्यांचा काही संबंध नाही. स्वाभिमानी आमची मजबूत आहे.

Rahul Ghule joins Congress
Sugar Millers Politics : 'साखरसम्राटां'ना सुटेना 'आमदारकी'चा मोह...! सोलापुरातील 9 कारखानदार विधानसभेच्या रिंगणात!

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राहुल घुले हे इच्छुक होते. मात्र, राजू शेट्टी (Raju shetti) यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्याला संधी न देता मतदारसंघाबाहेरील पदाधिकाऱ्याला संधी दिली. पराभूत उमेदवाराला अपेक्षेइतकीही मते मिळाली नाहीत. त्यामुळे घुले हे गेल्या काही महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कामापासून लांब होते.

Rahul Ghule joins Congress
Raj Thackeray : लाडकी बहीण म्हणता...मग लाडके भाऊ काय मेले काय?; राज ठाकरेंचा सरकारला सवाल

राहुल घुले हे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील नवीन संघटनेचे काम करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र प्रणिती शिंदे यांच्या आज झालेल्या सभेत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम पाहणाऱ्या तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी थेट संबंध असणाऱ्या राहुल घुले यांच्या पक्षप्रवेशाचा पंढरपूरमधील काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना फायदा होतो का, हे पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com