raju shetti : ZP च्या तोंडावर राजू शेट्टींच्या खंद्या समर्थकाचा भाजपात प्रवेश! सांगलीत चंद्रकांतदादांचा राजकीय भूकंप

Chandrakant Patil Politics : सध्या राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकींचा धुरळा उडाला असून भाजपकडे इच्छुकांचा रेटा वाढल्याचा दिसत आहे.
raju shetti
raju shettisarkaranama
Published on
Updated on
Summary
  1. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

  2. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला.

  3. या प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे.

Sangli news : राज्यात महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. सध्या राज्यातील महापालिकांच्या महापौर पदासाठी महायुतीत खलबत्त होताना दिसत असून महाविकास आघाडीतील तिनही पक्षांकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी रणनीती आखली जात आहे. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. राजू शेट्टींच्या खंद्या समर्थकाचा भाजपमध्ये प्रवेश झाला असून ZP च्या तोंडावर भाजपने जोरका धक्का दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी रविवारी (ता.२५) जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. महेश खराडेंच्या भाजप प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा हादरा बसला आहे.

तालुका दुष्काळमुक्त व्हावा. तालुक्यात पाणी योजना यावेत यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडून स्वाभिमानीत प्रवेश केला होता. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ऊस दर आंदोलन, शक्तिपीठ महामार्ग, शेतकर्‍याची अडकलेली ऊस बिले, दुष्काळ छावणी सुरू कराव्या असे अनेक आंदोलन केली आहेत. त्याच्यावर अनेक गुन्हे ही दाखल करण्यात आले आहेत. पण अचानक ते आज भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांना राजकीय धक्का बसला आहे.

raju shetti
Raju Shetti News: राजू शेट्टींचा आजपर्यंतचा सर्वात मोठा गंभीर आरोप; म्हणाले,'मुख्यमंत्री फडणवीस हे सर्वात मोठे ब्लॅकमेलर..'

दरम्यान विधानसभा निवडणुकीवेळी महेश खराडे यांनी आमदार रोहित पाटील यांना पाठिंबा दिला होता. ज्यामुळे संजयकाका यांच्याविरोधात रोहित पाटील यांना ताकद निर्माण झाली होती. तर त्यांच्या पाठिंब्यानंतर महेश खराडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. पण रोहित पाटील यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी आज आपल्या शंभरहून अधिक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आ. गोपीचंद पडळकर यांनी महेश खराडे यांच्या प्रवेशाचा मार्ग सूकर केल्याच्याही सध्या चर्चा सुरू असून आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष संग्राम महाडिक , तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

raju shetti
Raju Shetti : ‘एनडीआरएफ’च्या मदतीच्या प्रस्तावाबाबत राजू शेट्टींचा मोठा दावा; ‘केंद्राकडून महाराष्ट्र सरकारवर दबाव...’

FAQs :

1) महेश खराडे यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
👉 महेश खराडे यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे.

2) महेश खराडे कोण आहेत?
👉 ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष आणि राजू शेट्टी यांचे समर्थक आहेत.

3) भाजप प्रवेश कुठे झाला?
👉 सांगली येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश झाला.

4) या प्रवेशाचा राजकीय परिणाम काय होईल?
👉 सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

5) स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर याचा काय परिणाम होईल?
👉 संघटनेला सांगली जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com