Rashmi Barve : रश्मी बर्वेंचं बॅड लक? आधी लोकसभेची निवडणूक लढवण्यापासून वंचित, तर आता 'झेडपी'चा मार्गही बंद

Nagpur News, Ramtek Lok Sabha Rashmi Barve News: जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने लोकसभा निवडणूक लढण्यासापासून वंचित राहिलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचा आता जिल्हा परिषदेत परतण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे.
Rashmi Barve
Rashmi Barvesarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 20 July : जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने लोकसभा निवडणूक लढण्यासापासून वंचित राहिलेल्या नागपूर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांचा आता जिल्हा परिषदेत परतण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यांच्या टेकाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

विशेष म्हणजे बर्वे यांच्या जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे आणि त्यांचा फक्त पाच महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक राहिला आहे. रामटेक लोकसभेच्या (Ramtek Lok Sabha) निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या.

काँग्रेसच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवार रश्मी बर्वे (Rashmi Barve) होत्या. त्यांना उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आली होती. त्या निवडणुकीत आपल्यावर भारी पडतील याची भीती सुरुवातीपासूनच भाजपला वाटत होती. दरम्यान, त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर आक्षेप घेण्यात आला. निवडणुकीचा अर्ज भरायच्या आधाची त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं.

त्यामुळे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघामध्ये त्या उमेदवारी दाखल करण्यास आपात्र ठरल्या. काँग्रेसला (Congress) याची आधीच शंका होती. यासाठी त्यांनी आपला बी प्लॅन आधीच ठरवला. त्यानुसार रश्मी बर्वे यांच्याऐवजी त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली.

Rashmi Barve
Sharad Pawar : दादांचं टेन्शन वाढलं! आमदार बेनकेंच्या भेटीनंतर पवारसाहेबांचे सूचक विधान; म्हणाले...!

श्यामकुमार बर्वे यांनी महायुतीचे राजू पारवे यांचा पराभवसुद्धा केला आहे. महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भाजपने (BJP) केलेले सर्व प्रयत्न काँग्रेसने हाणून पाडले होते. या दरम्यान जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कारवाईला रश्मी बर्वे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने जात प्रमाणपत्रावर केलेल्या कारवाईला स्थगिती दिली होती. लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया पुढे गेल्याने त्यांना न्यायालयाने त्यांना निवडणूक लढता येणार नाही असेही त्यावेळी स्पष्ट केले होते.

त्यानंतर जिल्हा परिषदेचे सदस्यत्व बहाल केले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र झाले उलटच. राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी झालेल्या कार्यक्रमांमध्ये बर्वे यांच्या जिल्हा परिषद सर्कलचाही समावेश आहे. त्यांचा पाच महिन्यांचा कार्यकाळ अद्याप शिल्लक आहे. जानेवारी 2025 पर्यंत जिल्हा परिषदेच्या कार्यकाळ संपत आहे.

Rashmi Barve
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा 'वाघनखां'वरुन CM शिंदेंवर वार; म्हणाले,"..वाघनखं नसली तरी सरकारी नखं..!"

पाच महिन्यांसाठी बर्वे यांच्या टेकाडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चंद्रपूरचे माजी खासदार बाळू धानोरकर यांचे अकाली निधन झाले होते. त्यांचा सुमारे एक वर्षांचा कार्यकाळ शिल्लक होता. काटोल-नरखेडचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी मध्येच आमदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हा त्यांचा सुमारे दोन वर्षांचा कार्यकाळ बाकी होती. मात्र, या दोन्ही मतदारसंघात पोट निवडणूक घेण्यात आली नव्हती हे विशेष.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com