Raju Shetti : राजू शेट्टी शेतकरी चळवळीचा 'निखारा' पेटता ठेवणार; खासदारकी, आमदारकीपेक्षा 'मुकुटात' तोच शोभून दिसणार

Swabhimani Shetkari Sanghatna News : भविष्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलनाची आणि राजकीय भूमिका काय असणार? यावर विचार मंथन करण्यासाठी बारामतीत बैठक होणार आहे.
raju shetti
raju shettisarkarnama

2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha Election 2024 ) सलग दुसऱ्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. हातकणंगले मतदारसंघात तिंरगी झालेल्या लढतीत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने ( Dhairyasheel Mane ) यांचा विजय झाला आहे. या पराभवानंतर शेट्टींनी भावूक होत "माझं काय चुकलं, शेतकऱ्यांनी तुम्हीही...", असा सवाल विचारला होता.

पराभवानंतर खचून न जाता शेट्टी शेतकऱ्यांसाठी पुन्हा मैदानात उतरले आहेत. "लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. चळवळीचा निखारा पेटता ठेवून राज्यभर विविध प्रश्नांसाठी आंदोलने आणि मोर्चे चालू ठेवावेत," असं आवाहन शेट्टींनी केलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून आज पार पडली. यावेळी राजू शेट्टींनी ( Raju Shetti ) कार्यकर्त्यांना संबोधित केलं. या बैठकीत पराभवाच्या कारणांवर चर्चा झाली.

raju shetti
Video Vishal Patil Vs Jayant Patil : जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात जाऊन विशाल पाटील अन् विश्वजीत कदमांनी दिलं थेट आव्हान

राजू शेट्टी म्हणाले, "लोकसभेत पराभव झाल्यानं कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. चळवळीचा निखारा पेटता ठेवून राज्यभर विविध प्रश्नांसाठी आंदोलने आणि मोर्चे चालूच ठेवावेत. खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी चळवळीचा मुकूट आपल्या डोक्यावर शोभून दिसतो."

"शेतकरी आंदोलन आणि चळवळीशी प्रतारणा न करता चळवळ प्रामाणिकपणे करावी. शिवाय स्वाभिमानीचे राजकारण वेगळ्या पद्धतीनं करावे. कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये," अशा सूचनाही शेट्टींनी दिल्या आहेत.

raju shetti
Video Raju Shetty News : मविआच्या नेत्यांनी फसवले; राजू शेट्टी यांनी केला गंभीर आरोप

दरम्यान, भविष्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलनाची आणि राजकीय भूमिका काय असणार? यावर विचार मंथन करण्यासाठी 22 आणि 23 जूनला बारामतीत राज्य कार्यकारणीची व्यापक बैठक होणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com