Video Raju Shetty News : मविआच्या नेत्यांनी फसवले; राजू शेट्टी यांनी केला गंभीर आरोप

Political News : महाविकास आघाडीच्या कारभारावर राजू शेट्टी यांनी जोरदार टीका केली. त्यासोबतच यावेळी लोकसभा निवडणुकीत पराभव का स्वीकारावा लागला याची कारणे सांगितली.
raju shetti
raju shettisarkaranama

Loksabha Election Result : लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या जिव्हारी लागला आहे. सुरुवातीच्या काळात हा मतदारसंघ महाविकास आघाडी सोडेल अशी चर्चा होती पण शेवटच्या क्षणी शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळे राजू शेट्टी यांना पराभव स्वीकारावा लागला.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टी यांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमाशी संवाद साधताना महाविकास आघाडीच्या (MVA) कारभारावर जोरदार टीका केली आहे. (Raju Shetty News)

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शक्तीपीठ महामार्ग व लोकसभा निवडणुकीवर शनिवारी भाष्य केले. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच त्यांनी कोल्हापूर येथे त्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यासोबतच यावेळी शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव का स्वीकारावा लागला याची कारणे सांगितली.

महाविकास आघाडीने खरेतर निवडून आल्यानंतर काय काम करणार याचा ड्राफ्ट तयार केला होता. तो ड्राफ्ट जयंत पाटील (Jaynat Patil) व बंटी पाटील यांनी तयार केला होता. त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला. त्यापूर्वी सहा महिन्यांपासून ही जागा सोडली जाणार आहे, असे सांगत होते. मी उमेदवार असल्याने सर्वांना भेटावे असे त्यांना वाटत होते. मी सगळयांना भेटलोही. मात्र, या नेत्यानी शेवटी करायचे तेच केले, असा आरोप राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केला.

raju shetti
Dattatray Bharne News : असं बनवलं आमदार दत्ता भरणेंना ‘मामा’; नेमकं काय घडलं...?

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे. जवळपास बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. शेतजमीन महामार्गासाठी देण्यास शेतकऱ्यांनी दर्शवला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शक्तीपीठ महामार्गाची सध्या गरज नाही. गोवा, नांदेड, लातूर या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग असल्याने या ठिकाणी नव्या महामार्गाची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राजू शेट्टी यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती. या संदर्भात राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांची दोन वेळा भेट देखील झाली मात्र उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत चाललेली चर्चा ऐनवेळी फिस्कटली. महाविकास आघाडीने मशाल चिन्हावर माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी देत फसवणूक केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.

raju shetti
Eknath Khadse News : आपल्याच 'इच्छे'ने अडचणीत आलेल्या भुजबळांच्या मदतीला धावला अखेर 'हा' जुना सवंगडी

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com