Solapur Municipal Corporation

Solapur Municipal Corporation

sarkarnama

तडीपार उपमहापौरांची महापालिकेत रंगली बैठक

रेणुका नगर येथील व्हॉलीबॉल मैदानाचे उद्‌घाटन केले.
Published on

सोलापूर : सालापूर महापालिकेचे तडीपार उपमहापौर राजेश काळे हे न्यायालयाच्या कामाकाजासाठी एक दिवसाची परवानी घेऊन शहरात आले होते. मात्र, त्यांनी महापालिकेत (Solapur Municipal Corporation) झोन अधिकारी, नगररचना विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 31 डिसेंबरपर्यंत श्री महात्मा बसवेश्‍वर उद्यनाचे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी सक्त सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

<div class="paragraphs"><p>Solapur Municipal Corporation</p></div>
२४ तासात चार्जशीट, अन् ४८ तासात निकाल; विनयभंगातील आरोपीला शिक्षा

भाजपचे (BJP) उपमहापौर राजेश काळे यांच्यावर शासकीय कामात अडथळे, दरोडा, खंडणी, हप्ते वसुली आदी सात गुन्ह्याखाली उस्मानाबाद व सोलापूर जिल्हा आणि इंदापूर तालुक्‍यातून तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर त्यांनी पाच दिवसात महापालिकेत येऊन अधिकाऱ्यांची बैठक घेत विरोधकांना आश्‍चर्याचा धक्‍का दिला. सोलापूर न्यायालयात सुनावणी असल्याने त्यांनी शहरात येण्यासाठी एक दिवसाची रितसर परवानगी घेतली होती. सकाळी विजापूर नाका पोलिस ठाण्यात हजेरी दिली अन् थेट महापालिका गाठली.

महापालिकेच्या कार्यालयात विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत भांडवली, वार्डवाईज कामांचा आढावा घेतला. उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. रखडलेल्या बसवेश्‍वर उद्यानाच्या जागेची त्वरित मोजणी करावी. नवीन वर्षाच्या निमित्ताने या उद्यानाचे भव्य उद्‌घाटन करण्यात येणार असल्याचे काळे यांनी सांगितले. तसेच रेणुका नगर येथील व्हॉलीबॉल मैदानाचे उद्‌घाटन करीत एक दिवसासाठी मिळालेल्या सुट्टीत पालिकेची कामे उरकली.

<div class="paragraphs"><p>Solapur Municipal Corporation</p></div>
सेनेच्या बाजोरियांना महाविकास आघाडीतील एका पक्षानेच इंगा दाखवला..

तडीपार कारवाईविरोधात विभागीय आयुक्‍तांकडे अपिल

काळे यांनी तडीपार कारवाईविरोधात विभागीय आयुक्‍तांकडे आपिल केले आहे. या कारवाई विरोधात पोलिस महासंचालक मुंबई, राज्य मागासवर्गीय आयोग, अनुसूचित जाती-जमाती आयोग दिल्ली, लोकायुक्‍त मुंबई आणि मानवी हक्‍क आयोगाकडे तक्रार दिली आहे. पुढच्या मंगळवारी विभागीय आयुक्‍तांकडे सुनावणी आहे. दरम्यान, सोलापूर न्यायालयात तारखांसाठी हजेरी लावणे आवश्‍यक होते. त्यामुळे एकदिवसाची परवानगी घेतली. महापालिकेच्या सभेलादेखील परवानगी मागितली असल्याचे उपमहापौर काळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com