सेनेच्या बाजोरियांना महाविकास आघाडीतील एका पक्षानेच इंगा दाखवला..

अकोला-वाशिम आणि बुलढाणा विधान परिषद मतदारसंघात शिवसेनेसाठी धक्कादायक निकाल
Vasant Khandelwal and Gopikishan Bajoriya
Vasant Khandelwal and Gopikishan BajoriyaSarkarnama
Published on
Updated on

वाशीम : स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत असतानाही महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया (Gopikiashan Bajoriya) पराभूत झाले आहेत. वाशीम जिल्ह्यात महाविकास आघाडीत खिंडार पाडण्यात भाजपची रणनीती यशस्वी ठरून भाजपचे वसंत खंडेलवाल विजयी झाले आहेत. वाशीम जिल्ह्यात आघाडीतील एका पक्षाने पूर्णपणे भाजपला साथ दिली तर, स्वपक्षाच्या काही मतदारांनीही बाजोरियाला इंगा दाखविल्याची चर्चा आहे.

Vasant Khandelwal and Gopikishan Bajoriya
भाजपकडून आघाडीला धक्का; खंडेलवाल यांची बाजोरियांवर मात

राज्यात महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी आहे. अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा शिवसेनेकडे आहे. या मतदार संघावर १९९६ पासून २०१६ पर्यंत झालेल्या चारही निवडणुकीमध्ये शिवसेनेने भगवा फडकवून आपले वर्चस्व अबाधित ठेवले होते. या चार निवडणुकीमध्ये १९९६ सर्वप्रथम आमदार राजेंद्र पाटणी यांनी विजयी होवून काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा बहुमान पटकावला होता. त्यानंतर झालेल्या तिन्ही निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार गोपीकिसन बाजोरिया यांनी विजयी होवून त्यांच्या विजयाची ‘हॅटट्रिक’ केली होती. त्यामुळे २०२१ च्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीकडे असलेल्या बहुसंख्य मतांच्या भरवशावर महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिसन बाजोरिया यांचाच विजय होणार असल्याचे महाविकास आघाडीत सहभागी असलेले लोकप्रतिनिधी व मतदार चर्चा करीत होते.

Vasant Khandelwal and Gopikishan Bajoriya
फडणवीस म्हणाले; पुण्यात भाजपाचेच अस्तित्व जाणवते

या निवडणुकीत भाजपने वसंत खंडेलवाल यांना उमेदवारी दिल्याने ही निवडणूक दोन्ही उमेदवारांसाठी प्रतिष्ठेची होती. भाजपचे उमेदवार खंडेलवाल यांनी तीनही जिल्ह्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या विजयाचे समीकरण मांडून त्यांनी शिस्तबद्ध प्रचाराला प्रारंभ केला होता. वसंत खंडेलवाल यांच्या तुलनेत बाजोरिया मातब्बर समजले जात होते. भाजपने महाविकास आघाडीतील नाराज असलेल्या मतदारांना व काही नेत्यांनाही चुचकारत विजयाची ‘घडी’ बसविल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत तीनही जिल्ह्यातील एकूण ८२१ मतदार होते. ८२१ पैकी भाजपचे मतदान दोनशेच्या आसपास होते. तर, महाविकास आघाडीकडे ५०० मतांचा गठ्ठा होता. वंचितची मते निर्णयाक होती.

या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांना ४४३ मते मिळालीत. तर, शिवसेनेचे उमेदवार गोपीकिसन बाजोरिया यांना ३३४ मते मिळाली. उल्लेखनिय म्हणजे या निवडणुकीत १३ मतदारांनी मतदानच केले नाही. तसेच ३१ मते अवैध ठरलीत. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी विजय प्राप्त केला. प्रतिस्पर्धी उमेदवार गोपीकिसन बाजोरिया यांचा १०९ मतांनी पराभव करून शिवसेनेचा ‘गड’ जिंकण्याचाही बहुमान मिळविला आहे.

अकोला-बुलडाणा-वाशीम स्थानिक स्वराज्य संस्थेचे नवनिर्वाचित आमदार वसंत खंडेलवाल यांच्या विजयाचे वाशीम जिल्ह्यात विविध स्तरातून स्वागत करण्यात आले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला.

Vasant Khandelwal and Gopikishan Bajoriya
हिंम्मत असेल तर सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदानाने घ्यावी

खासदार गवळींची अनुपस्थिती भोवली
वाशीम जिल्ह्यात महाविकास आघाडीचे बहुमत असताना वसंत खंडेलवाल यांना मिळालेले मताधिक्य चर्चेचा विषय आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी निवडणूक काळात जिल्ह्याबाहेर होत्या याचाही फटका शिवसेनेला बसला आहे. तसेच, महाविकास आघाडीतील एका घटक पक्षाने तर पूर्णपणे भाजपसोबत बैठकच जमविल्याने भाजपने हा गड सर केला आहे. बाजोरीयांचे मतदार बाजोरीयासोबत खंडेलवाल यांच्याही संपर्कात असल्याने बाजोरीयांना चेकमेट मिळाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com