Solapur Municipal Corporation's election
सोलापूरला 1960मध्ये नगरपालिका स्थापन झाली. त्यानंतर अवघ्या चार वर्षांत म्हणजे १९६४ मध्ये तिचे महानगरपालिकेत रुपांतर करण्यात आले. स्थापनेपासून सोलापूर महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. मध्यंतरी दोन वर्षे जनता दलाचा महापौर झाला होता. मात्र, आतापर्यंतचेबहुतांश महापौर हे काँग्रेस पक्षाचे राहिलेले आहेत. महापालिका अस्तित्वात आल्यापासून २०१७ पर्यंत काँग्रेसची सत्ता होती. मात्र, २०१७ पासून महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. आगामी निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. सध्या महापालिकेत १०२ नगरसेवक जनतेतून निवडून येतात, तर पाच स्वीकृत नगरसेवक निवडले जातात.