Telangana Election: 'मागील वेळी १०५ जागांवर डिपॉझिट झाले होते जप्त, या वेळी...' के कविता यांचा भाजपवर हल्लाबोल!

BRS and BJP : तेलंगणा निवडणुकीसाठी भाजपने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
K Kavita
K Kavitasarkarnama
Published on
Updated on

Solapur News: तेलंगणात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस नेत्या आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, तेलंगणात यंदा भाजपचे सर्व जागांवर डिपॉझिट जप्त होईल.

भाजपने आज (रविवार) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यानंतर के कविता यांनी अशाप्रकारे टिप्पणी करत भाजपवर निशाणा साधला. भाजपने पहिल्या यादीत तेलंगणात ५२ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. ज्यामध्ये तीन खासदारांनाही तिकीट दिलं गेलं आणि १२ महिलांना मैदानात उतरवलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

K Kavita
Ahmednagar Politics: सुजय विखेंची डोकेदुखी वाढली ? अजितदादांच्या गटाची नगर दक्षिणच्या जागेसाठी चाचपणी

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार सोलापुरात बीआरएस नेत्या के कविता यांनी म्हटले की, ''मागील वेळी तेलंगणात १०५ जागांवर भाजपचे डिपॉजिट जप्त झाले होते. मात्र, यंदा तर सर्वच जागांवर डिपॉझिट जप्त होईल. तेलंगणात भाजपला कोणतेही स्थान नाही. त्यामुळे त्यांनी निवडणुकीसाठी कोणतीही रणनीती आखली तरी काहीही उपयोग होणार नाही.''

प्रसारमाध्यमांशी बोलताना के कविता म्हणाल्या की, तेलंगणात लढाई एकतर्फी आहे, बीआरएसचे सरकार जनतेच्या आशीर्वादाने जिंकून पुन्हा सत्तेवर येईल. कारण मागील दहा वर्षांमध्ये बीआरएस सरकारने सर्वांसाठीच काम केले आहे. मग तो शेतकरी असो की महिला, युवक, शिक्षण, मागासवर्गीयांचे सशक्तीकरण असेल.

त्यांनी हेदेखील सांगितले की, ज्या प्रकारचे काम तेलंगणात झाले आहे, आज संपूर्ण देशभरात तेलंगणाचे उदाहरण दिले जाते. आम्हाला गर्व आहे की आम्ही ज्या प्रकारे कामं केली, ती कामंही आम्ही यामुळे करू शकलो कारण जनतेची पूर्णपणे आम्हाला साथ होती. त्यांच्या आशीर्वादानेच आम्ही हॅटट्रिक करू आणि आमच्या लोकांच्या आवडत्या नेत्यास पुन्हा मुख्यमंत्री बनवू, असा आमचा विश्वास आहे. दक्षिण भारताच्या इतिहासात कधीच कोणी सलग तीन वेळा मुख्यमंत्री बनलेला नाही.

K Kavita
Parbhani BJP Political News : भाजप जिल्हाध्यक्षावर लैंगिक अत्याचाराचा आरोप; मुरकुटे म्हणतात हे गुट्टेंचेच षडयंत्र...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com