कोल्हापुरात 'MIM' च्या एन्ट्रीवरून वाद चिघळणार? जिथ कार्यालय होणार तिथं हनुमान चालीसासाठी परवानगी द्या

Clases In Kolhapur Over MIM Entry : कोल्हापुरात एमआयएम कार्यालयाच्या उद्घाटनाच्या आधीच मोठा वाद उफाळला. यामुळे शहरातील राजकीय वातावरण काही काळ तापले होते.
Police Bandobast Over MIM Entry
Police Bandobast Over MIM Entrysarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कोल्हापूर शहरातील बागल चौक येथे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत एमआयएम कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

  2. या कार्यक्रमावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे.

  3. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर शहरात तणाव निर्माण झाला असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Kolhapur News : सोमवारी खासदार अससुद्दीन ओवेसींच्या प्रमुख उपस्थित कोल्हापूर शहरातील बागल चौकात एमआयएम कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. मात्र याच्याआधीच येथे वादाला ठिणगी पडली. हिंदुत्ववादी संघटना, कार्यकर्ते आणि नागरिकांनी या उद्घाटनास तीव्र विरोध केला आहे. आज हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बागल येथे जमून या घटनेचा निषेध व्यक्त केला. तसेच येथे कार्यालय करण्यास विरोध दर्शवला आहे. या दरम्यान येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याने परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

बागल चौक येथे सोमवारी होणाऱ्या एमआयएम पक्षाच्या कार्यालय उद्घाटनास स्थानिक नागरिक व तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. आज (28 सप्टेंबर) शाहूपुरी विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. डोके यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, बागल चौक परिसरात एमआयएमचे कार्यालय सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीचेही संकेत मिळाले आहेत. यामुळे परिसरातील हिंदू समाजात मोठा असंतोष निर्माण झाला असून नवरात्रोत्सवाच्या काळात तणाव व दंगल होण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Police Bandobast Over MIM Entry
Kolhapur Politics : 'जमेत धरलं नाही, मी लंडनला गेल्यावर...', भाजप-शिवसेनेवर आरोप करत मुश्रीफांचा इशारा; म्हणाले, 'तर त्या ठिकाणी बंडखोरी...'

बागल चौक हे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ठिकाण आहे. येथे नवरात्रोत्सव शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा होणे आवश्यक आहे. त्यामुळे एमआयएमचे कार्यालय सुरू करण्यास व कार्यक्रमाला परवानगी देण्यास नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. याबाबत परवानगी देण्यात आलीच तर सकल हिंदू समाजाच्या वतीने बागल चौकात महाआरतीचे आयोजन करून निषेध नोंदविण्यात येईल, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Police Bandobast Over MIM Entry
Kolhapur Politics: ठरवून बाहेर ठेवलेल्या 'MIM'ची अखेर कोल्हापुरात एन्ट्री होणार; औवेसी राजकारण फिरवणार ?

FAQs :

प्र.१: कोल्हापूरमध्ये कोणत्या कार्यक्रमावरून तणाव निर्माण झाला?
उ: एमआयएम कार्यालयाच्या उद्घाटनावरून.

प्र.२: या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कोण आहेत?
उ: खासदार असदुद्दीन ओवेसी.

प्र.३: उद्घाटन कुठे होणार आहे?
उ: कोल्हापूर शहरातील बागल चौक येथे.

प्र.४: या कार्यक्रमाला कोण विरोध करत आहे?
उ: हिंदुत्ववादी कार्यकर्ते तीव्र विरोध करत आहेत.

प्र.५: प्रशासनाने काय पावले उचलली आहेत?
उ: तणाव लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com