Thackeray group warning to Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांना ठाकरे गटाचा इशारा ; 'सांभाळून रहा'...

Maharashtra Politics : आमच्यासारख्या महिला कार्यकर्त्यांमुळे तुम्ही मोठ्या नेत्या झाल्यात.
Smita Ashtekar, Neelam Gorhe
Smita Ashtekar, Neelam GorheSarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : ठाकरे गटाच्या नेत्या, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. गोऱ्हे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटात विशेष करून महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षा आणि महिला संघटक स्मिता अष्टेकर यांनी गोऱ्हे यांच्यावर घणाघात केला आहे. "नगर जिल्ह्यात आल्यास 'सांभाळून' राहा असा गर्भित आणि सूचक इशारा अष्टेकर यांनी दिला आहे. अष्टेकर यांनी व्हिडिओ शेअर करीत गोऱ्हे यांनी इशारा दिला आहे.

Smita Ashtekar, Neelam Gorhe
Sharad Pawar In Nashik : येवल्याच्या सभेपूर्वी शरद पवार, म्हणाले, "बंडखोरांबाबतचा अंदाज चुकला, हा माझा दोष...

" बाळासाहेब ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना मुलगी मानले, उद्धव ठाकरेंनी त्यांना बहीण मानले आणि त्यांना तब्बल चार वेळेस मागच्या दाराने विधान परिषदेमध्ये आमदार केले, पक्षाच्या उपनेत्या केले तसंच विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांना बसवलं. नीलम गोरे यांना शिवसेनेने शून्यातून मोठं केले. मात्र असं असताना सत्तेच्या हव्यासापोटी आपलं पद जाऊ नये म्हणून त्यांनी आता मूळ शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे," असा आरोप त्यांनी केले.

"तुम्ही आता जेव्हा कधी नगरमध्ये याल तेव्हा सांभाळून राहा, मी किती आक्रमक आहे हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर कोकणामध्ये आम्ही महिलांनी छातीचा कोट करून तुम्हाला सुरक्षित ठेवत तिथे प्रचार केला याचा विसर तुम्हाला पडलेला दिसतोय. त्यामुळे नगरमध्ये येताना सांभाळून रहा," असे अष्टेकर म्हणाले.

Smita Ashtekar, Neelam Gorhe
Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंची साथ का सोडली ? ; नितेश राणेंनी सांगितलं कारण..

"नीलम गोऱ्हे म्हणजे शिवसेनेतील पहिल्या महिला गद्दार आहेत. आमच्यासारख्या महिला कार्यकर्त्यांनी तुम्हाला विविध आंदोलनात सक्रिय पाठिंबा दिला आणि त्यामुळे तुम्ही मोठ्या नेत्या झाल्यात. कोठेवाडी प्रकरणात आम्ही तुमच्या सोबत राहिलो आणि नाव तुमचे मोठे झाले. मात्र तुम्ही स्वतःला पद मिळवत असताना आणि स्वतःचं नाव पक्षापुढे मोठे करत असताना आमच्यासारख्या सामान्य महिला कार्यकर्त्यांना काही एक दिलं नाही आणि पक्ष सोडून पक्षाशी गद्दारी केली," असा आरोप अष्टेकर यांनी केला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com