Sharad Pawar In Nashik : येवल्याच्या सभेपूर्वी शरद पवार, म्हणाले, "बंडखोरांबाबतचा अंदाज चुकला, हा माझा दोष...

Sharad Pawar Press Conference Live : बंडखोरी केलेल्या आमदारांचा पराभव होईल.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (शनिवारी) सांयकाळी येवला बाजार समितीच्या मैदानावर सभा होत आहे. या सभेपूर्वी पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.( Nashik NCP Press Conference)

छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकच्या येवला मतदारसंघात शरद पवार यांची पहिली जाहीर सभा होत आहे. पवार हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, "बंडखोरांबाबतचा अंदाज चुकला, हा माझा दोष. बंडखोरी केलेल्या आमदारांचा पराभव होईल. प्रफुल्ल पटेलांचा लोकसभेत पराभव झाला तरी त्यांना राज्यसभेत पाठवले. दहा वर्ष ते मंत्रीपदावर होते,"

Sharad Pawar
Neelam Gorhe : नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंची साथ का सोडली ? ; नितेश राणेंनी सांगितलं कारण..

पवार यांच्या सभेसाठी स्थानिक नेते माणिकराव शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय कृषिमंत्री असताना पवारांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लहान-मोठ्या प्रकल्पांची परतफेड म्हणून सभेला जास्तीत जास्त लोकांनी यावे अशी साद घातली जात आहे. पवारांच्या स्वागतासाठी वीस फुटाचा जम्बो हार करण्यात आला आहे. यासाठी दीडशे किलो फुलांचा वापर करण्यात आला आहे.

Sharad Pawar
Maharashtra Politics : आमचा प्रश्न पुन्हा तोच आणि तोच..; अजितदादांवरील आरोप खोटे की खरे ?

शरद पवारांच्या येवल्यातील सभेची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न छगन भुजबळ करीत असल्याचा गंभीर आरोप माणिकराव शिंदे यांनी केला आहे. मात्र, कितीही मांजरे आडवे गेली तरी सभेला गर्दी होणारच, असे सांगत सभेला गर्दी होणारच, असा विश्वास माणिकराव शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

वयाच्या 83व्या वर्षीही शरद पवार मैदानात उतरले आहेत. पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com