Satara News : विनयभंगप्रकरणी ठाकरे शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल!

Crime News : पतीने घेतलेल्‍या पैशांच्‍या वसुलीसाठी विवाहितेसह तिच्या दोन मुलींना मारहाण करत विनयभंग केल्याचा आरोप
Crime News
Crime News Sarkarnama

Satara Crime News : पतीने घेतलेल्‍या पैशांच्‍या वसुलीसाठी विवाहितेसह तिच्या दोन मुलींना मारहाण करत विनयभंग केल्‍याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात सात जणांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शहर प्रमुखासह पाच ते सहा जणांचा समावेश आहे.

याप्रकरणी सदर विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन अनिकेत विश्‍‍वास साळुंखे, संतोष बबनराव शिंदे, उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) शिवसेनेचा शहर प्रमुख शिवराज टोणपे, शैलेश नावडकर, डॉ. संजय ढाणे, संतोष शिंदे याची मैत्रीण (पुर्ण नाव पत्ता नाही) अशी त्‍यातील संशयितांची नावे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Crime News
Raju Shetty News : मतदानानंतर राजू शेट्टी पुन्हा एकदा मैदानात; थेट दिल्लीतील साखर आयुक्तांना लिहिले पत्र

सातारा शहर पोलीस(Satara Police) ठाण्‍यातून देण्‍यात आलेल्या माहितीनुसार सदर पीडित महिला दोन मुलींसह शहर परिसरात राहण्‍यास आहे. काही कारणास्‍तव ती पतीपासून विभक्‍त राहते. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता गोडोली नाका येथून संशयितांनी पीडित महिलेशी फोनवर संपर्क साधला. फोन करणाऱ्यांनी तुझ्‍या पतीने आमच्‍याकडून एक कोटी रुपये घेतले आहेत. ते वसुल कसे करायचे ते आम्‍हाला माहीत आहे, असे म्‍हणत पतीस मारल्‍याचे सांगितले.

तसेच 'गोडोली नाका परिसरात येण्‍यास सांगितले. यानुसार पीडिता त्‍याठिकाणी गेली. त्यावेळी अनिकेत साळुंखेने पीडित महिलेच्‍या दुचाकीची चावी काढून घेत मारहाण केली. मारहाण करतानाच त्‍याने तसेच इतरांनी पर्समधील पतीचा मोबाईल, टॅब, गळ्यातील मंगळसुत्र हिसकावले.'

Crime News
Kolhapur Shivsena : ...म्हणून आता कोल्हापुरातील ठाकरे-शिंदे गटाच्या निष्ठावंतांचा मुंबईत ठिय्या!

याशिवाय, मारहाणीवेळी कपडे फाडत त्‍यांनी पीडितेच्‍या दोन्‍ही मुलींना मारहाण करत चारचाकीत घातले. त्‍यांच्‍या तावडीतून मुलींची सुटका करुन घेत सदर पीडितेने सातारा शहर पोलिस ठाणे गाठत त्‍यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. यानुसार सात जणांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक चौधरी करीत आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com