Raju Shetty News : मतदानानंतर राजू शेट्टी पुन्हा एकदा मैदानात; थेट दिल्लीतील साखर आयुक्तांना लिहिले पत्र

Political News : एफ. आर. पी पेक्षा जादा रक्कमेला मंजूरी देण्याबाबत कारखान्यांना लेखी आदेश निर्गमित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
Raju Shetty
Raju ShettySarkarnama
Published on
Updated on

kolhapur News : गेल्या दोन वर्षांपासून साखरेसह उपपदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळाला आहे. यामुळे साखर कारखान्यांकडे एफ. आर. पी. चा रक्कम अदा करून पैसे शिल्लक राहिले आहेत. या पैशावरती शेतकऱ्यांचा अधिकार असून राज्यातील सर्व पक्षाचे साखर कारखानदार एक होवून या पैशावरती डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत.

यामुळे गतवर्षी हंगामात झालेली चूक कारखानदारांनी न करता यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन एफ.आर.पी पेक्षा जादा रक्कमेला मंजूरी देण्याबाबत कारखान्यांना लेखी आदेश निर्गमित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (SFA) संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांचेकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. (Raju Shetty News)

Raju Shetty
Beed Lok Sabha Analysis : पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? बीड लोकसभा निवडणुकीच्या विजयाचे 'असे' आहे गणित..

गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील साखर कारखान्यांनी ऊसापासून इथेनॅाल निर्मिती करण्यास प्राधान्य दिले. यामुळे साखर, इथेनॅाल, बगॅस, को -जन, स्पिरीट, अल्कोहोल, मळी यासह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे.

यामुळे साखर कारखान्यांकडे उत्पादन खर्च वजा जाता पैसे शिल्लक राहू लागले आहेत. गतवर्षी राज्यातील सोमेश्वर, माळेगांव, विघ्नहर, भीमाशंकर या कारखान्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत एफ. आर. पी पेक्षा जादा रक्कमेस मंजूरी घेऊन शेतक-यांना त्यांच्या हक्काचे जादा पैसे दिले. मात्र याप्रमाणे राज्यातील इतर कारखान्यांनी मखलाशी करत वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव नसल्याचे कारण दाखवित शासनाकडे बोट दाखवून सर्वपक्षीय कारखानदार एकजूट करून या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ

यामुळे चालू हंगामातील साखर व उपपदार्थाच्या जादा उत्पन्नातील आलेले पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आताच साखर आयुक्तांनी सर्व कारखान्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन या विषयास मंजुरी घेण्याबाबत लेखी आदेश काढून कळविण्याबाबतची मागणी केली. यामुळे राज्यातील सर्व कारखान्यांना लेखी आदेश करून या विषयास साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये हा शेतकरी हिताचा निर्णय झाल्यास याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

Raju Shetty
Raju Shetti News : "2019 मध्ये कटकारस्थान करून माझा पराभव केला, पण...", राजू शेट्टींचं विधान

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com