Kolhapur Shivsena : ...म्हणून आता कोल्हापुरातील ठाकरे-शिंदे गटाच्या निष्ठावंतांचा मुंबईत ठिय्या!

Thackeray Vs Shinde Group : मुंबई आणि ठाण्यासह इतर लोकसभा जागांवरून ठाकरे गट आणि शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarkarnama

Loksabha Election 2024 : महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबईसह नाशिक येथे पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर आणि हातकणंगलेसह 11 लोकसभा मतदारसंघातील मतदान झाल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतील काही महत्त्वाचे प्रचारक मुंबईसह नाशिकमध्ये प्रचारासाठी दाखल झालेत.

अशातच कोल्हापूर मधील ठाकरे गटाचे नेते आणि शिंदे गटाचे नेते मुंबईत दाखल झालेत. इतकच नव्हे तर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून त्यांनी मुंबईत ठिय्या मारला आहे. मुंबई आणि ठाण्यासह इतर लोकसभा जागांवरून ठाकरे गट आणि शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी आपल्या निष्ठावंत सैनिकांना मुंबईत बोलावून घेतल्याने मुंबई,कल्याण,ठाणे यासह अन्य जागाही प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Sharad Pawar News : शरद पवारांंचा निस्सीम कार्यकर्ता पडला एकटा; भ्रमनिरास झाल्याने राजकारणाला रामराम!

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक काळ घालवला आहे. निवडणुकीच्या टप्प्यात मतदानापर्यंत पंधरा दिवसांच्या कालावधीत त्यांनी तीनवेळा कोल्हापूर दौरा केला आहे. या प्रत्येक दौऱ्यावेळी त्यांनी दोन दिवस कोल्हापुरात तळ ठोकला आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे((Eknath Shinde)) यांच्या प्रतिष्ठेचा बनल्याने या दोन्ही मतदारसंघावर विशेष लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे.

कोल्हापूर- हातकणंगले सोबत कल्याण, दक्षिण मध्य मुंबई, ठाणे यासह इतर जागाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाच्या बनल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी काटे की लढत म्हणून याकडे पाहिले जाते.

कोल्हापूर आणि हातकणंगलेचे मतदान पार पडल्यानंतर कोल्हापुरातील प्रचारक शिंदे गटाचे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने हे महायुतीकडून प्रचारात मुंबईत आहेत तर ठाकरे गटाकडून शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुनील शिंत्रे हे देखील मुंबईत तळ ठोकून आहेत.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Kolhapur Loksabha Election 2024 : कोल्हापूर-हातकणंगलेचा कल केव्हा येणार? निकाल कधीपर्यंत लागणार? वाचा सविस्तर...

यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर कोणत्याही क्षणी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शिवसेनेने मुंबई महापालिकेवर आपले अधिराज्य गाजवले आहे. मात्र प्रथमच शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक महत्वपूर्ण बनली आहे.

महापालिकेच्या निवडणुकीसाठी लिस्टमस टेस्ट म्हणून मुंबईतील लोकसभा निवडणुकीकडे पाहिले जाते. त्या अनुषंगानेच शिवसेनेचे दोन्हीही गट या लोकसभेत पूर्ण तयारीनिशी उतरले आहेत. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठोकलेला तळ याची उतराई करण्याची संधी महायुतीतील प्रचारकांना आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com