Crime News : जेलमध्ये असलेल्या आरोपीचा व्हिडिओ, फोटो व्हायरल! पोलिस म्हणतात...

Jail Video Viral : पोलिसांना माहितीच नाही कॅमेरा कुठून आला, 'इन्स्टा'वर तब्बल एक लाख...
Jail video viral
Jail video viral sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : कायदा सुव्यवस्था नसल्याची टीका विरोधकांनी विधानसभेत केली होती. त्यानंतर पोलिसांचा काही वचकच नाही, याचा प्रत्यय कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात आलाय. 24 तास जिथे पोलिस असतात तिथल्याच कैद्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय आणि पोलिसांना साधी खबरही नाही. गुंड कुमार गायकवाड याच्या खुनातील संशयित आरोपी अमर माने याचा कळंबा कारागृहातील फोटो आणि वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जातानाचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेत. हे व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर उपलब्ध असून एक लाखाहून अधिक लोकांनी ते पाहिले आहेत.

Jail video viral
BJP Politics : राहुल गांधी पंतप्रधानपदासाठी अयोग्य! जोडे मारून...

थेट कळंबा कारागृहात दबदबा निर्माण केल्याचा आणि विरोधकांना चिथावणी देणारा मजकूर यातून व्हायरल केला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कळंबा कारागृहात कैद्यांकडून मोबाईलचा खुलेआम वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कारागृह प्रशासनाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापुरातील कळंबा कारागृहातील सुरक्षितता नेहमीच चर्चेत राहिले आहे. गेल्या वर्षभरात याच कारागृहात सहा ते सात वेळा मोबाईल सापडल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. आज पुन्हा एकदा व्हायरल व्हिडिओ आणि फोटोने कळंबा कारागृहाच्या सुरक्षेतेचे बिंग फोडले. कारागृहामध्ये असणाऱ्या आरोपीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हाट्सअप आणि इन्स्टा स्टेटसला पडत आहेत.

गेल्या वर्षभरात अनेक वेळा या कारागृहात कारवाई झाल्याने अधिकाऱ्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अधिकाऱ्यांनी हा फोटो कळंबा कारागृहातील नसावा, असे स्पष्टीकरण दिल्याची माहिती आहे. मात्र, या फोटोने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत शिवाय सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे, हे सिद्ध होत आहे.

(Edited By Roshan More)

Jail video viral
Modi Government CEC Bill : मोदी सरकारनं हवं तेच केलं, वादग्रस्त विधेयक लोकसभेत मंजूर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com