Wai Maratha Protest : वाईच्या मराठा आंदोलकांपुढे प्रशासन नमलं; पाचवड फाट्यावरच स्वीकारले निवेदन...

Wai Maratha वाई सकल मराठा समाजाच्या वतीने पहाटे रायरेश्वर येथून ज्योत आणून वाई ते सातारा 'पुन्हा एकदा हक्काच्या आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला.
Pachwad Maratha Protest
Pachwad Maratha Protestsarkarnama
Published on
Updated on

-विलास साळुंखे

Wai Maratha Protest : अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेला लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वाई सकल मराठा समाजाच्या वतीने आज पहाटे रायरेश्वर येथून ज्योत आणून वाई ते सातारा 'पुन्हा एकदा हक्काच्या आरक्षणासाठी मोर्चा काढला हाोता. मात्र प्रशासनाने हा मोर्चा पाचवड येथेच अडवला. त्यामुळे पाोलिस व आंदोलकांत बाचाबाची झाली. आंदोलकांनी बॅरेकेटसह पोलिसांना मागे दाबत महामार्गाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिस व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर मोर्चा उड्डाण पुलाखाली स्थिरावला. त्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी निवेदन स्वीकारले.

अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर Maratha Protest झालेला लाठीहल्ला आणि गोळीबाराच्या निषेधार्थ वाई सकल मराठा Wai Maratha समाजाच्या वतीने पहाटे रायरेश्वर येथून ज्योत आणून वाई ते सातारा 'पुन्हा एकदा हक्काच्या आरक्षणासाठी मोर्चा काढण्यात आला. सकाळी सात वाजता श्री गणपती मंदिरापासून बावधन नाका, वाकेश्र्वर, कडेगाव ,व्याहळी, पाचवड व तेथून महामार्गावरुन सातारा येथे हा मोर्चा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी पोहचणार होता.

मात्र, मोर्चा प्रशासनाने पाचवड येथेच थांबवून निवेदन स्वीकारण्याचे ठरवले होते. मोर्चा साधारण पावणे दहाच्या सुमारास पाचवड येथे पोहचला त्यावेळी पोलिसांनी बॅरॅकेटस लावून रस्ता बंद केला होता तरीही मोर्चातील आंदोलक बॅरॅकेटसह पोलिसांना मागे दाबत महामार्गाच्या दिशेने मार्गक्रमण करीत होते. दरम्यान पोलिस व प्रशासनाचे अधिकारी यांनी मोर्चातील आंदोलकाना समाजातून सांगितल्याने मोर्चा उड्डाण पुलाखाली स्थिरावला.

यावेळी मोर्चातील संयाोजकांनी मोर्चाचा उद्देश सांगून उपस्थित प्रशासकीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांना मोर्चाचे निवेदन पोहचविण्याचे सांगण्यात आले. यावेळी संयोजकांनी आंदोलकांना विश्वासात घेवून दोन पर्याय देण्यात आले. त्यापैकी एक संबंधित आंदोलक हे सातारा येथे पायी जावून निवेदन देतील. दुसरा पर्याय पाचवड आंदोलकांच्या वतीने तरुण व महिला निवेदन देतील.

Pachwad Maratha Protest
Satara Maratha Protest : सातारा जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; कराडला कडकडीत बंद

त्यावेळी सर्वांनी दुसरा पर्याय देवून पाचवडला अतिरिक्त जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्याकडे निवेदन दिले.यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक बापू बांगर, वाईचे प्रांताधिकारी संजीव जाधव, तहसिलदार सोनाली मेटकरी, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे उपस्थित होते. संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा 'एक मराठा, लाख मराठा'चा नारा घुमला गेला. गावगाड्यात मोठ्या भावाची भूमिका बजावणाऱ्या मराठा समाजाने पुकारलेल्या या बंदला सर्वच समाजघटकांनी पाठिंबा दर्शविला.

या मोर्चात भैया डोंगरे, किशोर भोसले, अजित मांढरे, अक्षय निंबाळकर, प्रवीण (बाळू) भुसारी, संदीप गाढवे, नाना पिसाळ, विक्रम वाघ. भारत खामकर, प्रथमेश सुर्वे, युगल घाडगे.डॉ. संतोष मांढरे, किरण खामकर. सचिन शिंदे, अनिल सावंत, प्रमोद अनपट, नितीन कदम सर, अजित मांढरे, किशोर भोसले, अजित मांढरे, अक्षय निंबाळकर, जयवंत पवार, अमर गायकवाड, नारायण नलवडे,

अनिल सावंत, भैया डोंगरे, प्रमोद अनपट, चरण गायकवाड, काशीनाथ शेलार, विजय ढेकाणे, लालूशेठ शिंगटे, शशीकांत नाना पवार,विक्रम वाघ, प्रदीप कदम, जयवंत आबा पवार ,नाना पिसाळ, नितीन जगताप,प्रदीप जायगुडे, कुमार जगताप,निखिल भुसारी, बाळासाहेब चिरगुटे. काशीनाथ शेलार, स्वप्नील भिलारे, गोविंद इथापे. सचिन मानकुमरे, नितीन कदम, स्वप्निल भिलारे आदी सहभागी झाले होते.

Edited By Umesh Bambare

Pachwad Maratha Protest
Satara Maratha Protest : मराठा आंदोलकांवरील खटले विनामोबदला लढणार; सातारा बार असोसिएशनचा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com