शशीकांत शिंदेंना पाडले, त्या रांजणेंचा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी घरी जाऊन केला सत्कार..

मी विद्यार्थी चळवळीतुन Student movement पुढे आलो असून संघर्ष Conflict करण्याऱ्या व्यक्तींचे मला अप्रूप आहे. त्यामुळे मी आज रांजणे Dyandev Ranjane यांचा सत्कार करण्यासाठी आलो आहे.
Dyandev Ranjane, Chandrakant Patil
Dyandev Ranjane, Chandrakant PatilSandip Gawade, Kelghar reporter
Published on
Updated on

केळघर : जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघातून ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून संघर्षातून विजय मिळविला. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यासाठी आज मी आलो होतो. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी भावना आहे. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे मतही विचारात घेतले जाईल. या याबतचा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज आंबेघर येथे दिली.

आंबेघर येथे जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कारानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा बँकेवर जावळी सोसायटीच्या हाय होलटेज लढतीत ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यासाठी मुद्दाम आलो आहे. सामान्य कुटुंबातील रांजणे यांचा विजय हा महत्वपूर्ण असल्याने त्यांचा सत्कार भाजपच्या वतीने आज करण्यात आला. मी विद्यार्थी चळवळीतुन पुढे आलो असून संघर्ष करण्याऱ्या व्यक्तींचे मला अप्रूप आहे. त्यामुळे मी आज रांजणे यांचा सत्कार करण्यासाठी आलो आहे.

Dyandev Ranjane, Chandrakant Patil
शशिकांत शिंदेंना धूळ चारणारे ज्ञानदेव रांजणे आहेत तरी कोण?

श्री. पाटील म्हणाले, राज्य सरकार योग्य वेळ आल्यावर निश्चित पडेल. जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपालिकाच्या निवडणूका भाजपने स्वबळावर लढाव्यात, असा आग्रह आहे. मात्र, याबाबत काय निर्णय घ्यायचा हे स्थानिक पातळीवर असलेले कार्यकर्ते यांचे मत घेऊन ठरवले जाईल. भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष होण्यासाठी पक्षाच्या चिन्हावर लढाव्यात, अशी भूमिका आहे. प्रारंभी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रांजणे यांचा सत्कार करण्यात आला.

Dyandev Ranjane, Chandrakant Patil
जावळीतील दहशत मोडून काढण्यासाठीच रांजणे यांचा विजय आहे; शिवेंद्रसिंहराजे भोसले;पाहा व्हिडिओ

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, भाजपचे जिल्हा चिटणीस विठ्ठल देशपांडे, गीता लोखंडे, नगरसेवक विकास देशपांडे, दत्तात्रय पवार, तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, हरिभाऊ शेलार, मच्छिंद्र क्षीरसागर, बबनराव बेलोशे, जयदीप शिंदे, सागर धनावडे, अंकुश बेलोशे, शिवाजीराव गोरे, भानुदास ओंबळे, सानिया धनावडे, सुरेखा धोत्रे, प्रशांत करंजेकर, यांची उपस्थिती होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com