Sangli Political News : खासदार संजयकाका पाटील अन् रोहित पाटलांमधला वाद पुन्हा पेटला; 'हे' आहे कारण

SanjayKaka Patil Vs Rohit Patil News : ''...तर आम्हाला आमरण उपोषण करायची वेळ आली नसती!''
SanjayKaka Patil Vs Rohit Patil
SanjayKaka Patil Vs Rohit Patil Sarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News : माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील आता राजकीय आखाड्यात उतरले आहेत. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीनंतर रोहित पाटील राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट रोहित पाटील हे २०२४ च्या विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असे जाहीर करून टाकलं आहे. पण आता सांगलीमध्ये रोहित पाटील आणि भाजप खासदार संजयकाका पाटील यांच्यातला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पाटील(Rohit Patil) यांनी खासदार संजय पाटलांच्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे. पाटील म्हणाले, पाण्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न केले ते लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. त्यांनी जर प्रयत्न केले असते, तर आम्हाला आमरण उपोषण करायची वेळ आली नसती. त्यांनी प्रयत्न केले नाहीत म्हणूनच आम्हाला उपोषणाचा निर्णय घ्यावा लागत आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी संजय पाटलांना लगावला.

SanjayKaka Patil Vs Rohit Patil
Supriya Sule On NCP : कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लहान मुलालाही माहीत आहे `राष्ट्रवादी` म्हणजे शरद पवार...

तासगावच्या आमदार सुमन पाटील या पुत्र प्रेमासाठी, मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी राजकीय नौटंकी करत असल्याची टीका खासदार संजय पाटलां(Sanjay Patil)नी केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पाटील म्हणाले, निवडणुकीचा दृष्टिकोन माझ्या डोळ्यांसमोर मी कधीच ठेवला नाही. वयाच्या सोळाव्या वर्षापासून मतदारसंघांमध्ये फिरतोय. आजघडीला माझं वय वर्षे 24 आहे. अचानक निवडणूक लागली तर कदाचित मी निवडणुकीला उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे माझ्या भविष्याची चिंता करून जर मी राजकारण करत असतो तर ते केले नसते, असेही पाटील यांनी म्हणाले.

"...तर घरी बसायची माझी तयारी!"

लोकं काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहतात. माझे भविष्य अंधारात टाकायचे की नाही हे लोक ठरवतील. त्यामुळे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातल्या विवेकबुद्धी असणाऱ्या सर्व लोकांवर माझा विश्वास आहे. ते निश्चितपणाने माझं भविष्य ठरवतील. त्यांनी जर घरी बसवलं तर घरी बसायची माझी तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार पाटील यांचा उपोषणाचा इशारा...

राष्ट्रवादीच्या आमदार सुमन पाटील (Suman Patil) यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी नऊ गावांतील शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी मिळावे, या मागणीसाठी 2 ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. हे उपोषण राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्यासह हे आंदोलन करणार असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटलं आहे. या उपोषणाच्या घोषणेनंतर भाजप खासदार संजयकाका पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांच्यातला वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

टेंभू, म्हैसाळ योजनेसाठी निधी आणणार

खासदार संजय पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच पेड परिसरासह खानापूर, आटपाडी, खटाव आणि तासगाव तालुक्यातील गावातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे, अशी ग्वाही दिली आहे. पाटील म्हणाले, म्हैसाळ योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. त्याचप्रमाणे आता टेंभू व म्हैसाळ योजनेच्या अपूर्ण कामासाठी केंद्र सरकारकडून निधी आणणार आहे. म्हैसाळ योजनेसाठी ९८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेबाबत टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

SanjayKaka Patil Vs Rohit Patil
kolhapur Politics : ए. वाय. पाटलांचे कार्यकर्ते आक्रमक; ‘बिद्री कारखाना अथवा आमदारकी, वरिष्ठांकडून शब्द घ्या’

दरम्यान, टेंभू व म्हैसाळ योजनेचे काम अपूर्ण राहिले आहे. त्या कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीला जाऊन निधी आणणार आहे. ही योजना पूर्ण करून पेड, खानापूर, आटपाडी व खटाव आणि तासगावातील विसापूर सर्कलमधील २१ गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे, असेही पाटील म्हणाले होते.


(Edited By Deepak Kulkarni)

SanjayKaka Patil Vs Rohit Patil
Kolhapur Politics : भर कार्यक्रमात आमदार आवाडे अन् माजी नगरसेवक चाळके भिडले; खासदार माने बघतच राहिले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com