

Manoj Jarange Patil News : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने सध्या नगर जिल्ह्यामध्ये जरांगे यांच्या सभा होत आहेत. दरम्यान, त्यांनी जामखेडमध्ये मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळात नाही तोपर्यंत सरकारला सुटी नाही, असं म्हणत सरकारविरोधात पुन्हा आक्रमक होण्याचे सूतोवाच केले आहे. (Latest Marathi News)
सरकारने उपोषण सोडवण्यासाठी अनेक डाव टाकले, पण ठोस निर्णय होत नसल्याने त्यांच्या डावाला भुललो नाही, उलट ते उलटून लावले. उपोषण सोडवताना सरकारला आपण चार दिवसांत आरक्षण द्या म्हणालो, त्यांनी एक महिना मागितला. 14 तारखेला महिना पूर्ण होत आहे, पण त्यांना आणखी दहा दिवस वाढवून दिले आहेत. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा लढा यशस्वी करून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय सुटी नाही. 14 तारखेच्या अंतरवाली सराटा सभेला उपस्थिती दर्शवून एकी दाखवा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जामखेड येथे भेट दिली. तत्पूर्वी ते खर्डा येथे आले असता त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थळ चोंडी येथे अहिल्यादेवीचे दर्शन घेतले. या वेळी आमदार राम शिंदे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार केला.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, "मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही उपोषण सुरू केले होते. या वेळी सरकारने आम्हालाच कसे आरक्षण द्यावे यावर पर्याय विचारला. आंदोलन आम्हीच करतो, त्यांना पर्याय आम्हीच द्यायचा, मागणी करणारे आम्हीच मग तुम्ही काय करता, असा सवाल मी त्यांना केला. त्यांनी उपोषण सोडण्यासाठी खूप डाव टाकले; पण मी तुमच्यातला पोरगा आहे. कोणतीही गद्दारी होणार नाही, असे जरांगे पाटील यांनी ठासून सांगितले.
येत्या 14 तारखेला सरकारला दिलेला अल्टिमेट पूर्ण होत आहे. त्यामुळे अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या सभेसाठी तुम्ही कामाला सुटी सोडून या आपली गर्दी बघून सरकारने चारच दिवसांत परिपत्रकावर सह्या केल्या पाहिजेत. या वेळी समाजबांधवांनी तीन नियम पाळा उद्रेक व जाळपोळ करायचा नाही, आत्महत्या करायची नाही व शांततेच्या प्रक्रियेतून आपले आरक्षण मिळवायचे आहे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.