Kolhapur Politics : पालकमंत्री नियोजन समितीत आपलेच 'वाढपी' ठेवणार? नेत्यांना निधीची, कार्यकर्त्यांना निवडीची आशा..!

Kolhapur District Planning Committee : कोल्हापूर जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक रविवारी होणार आहे. त्यामुळे नियोजन समितीच्या मंडपात शिंदेंची सेना आपलेच वाढती ठेवणार का? याची चर्चा आता जोरात सुरू आहे.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

दोन आठवड्यापूर्वी पार पडलेल्या गोकुळ दूध संघाच्या एका कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी "लग्न कोणाचंही असू दे, पण जेवणाच्या मंडपात वाढपी आपला असला पाहिजे" असं उदाहरण दिले. जिल्ह्याच्या विकास कामाबाबत बोलताना हे वक्तव्य रविवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही लागू पडणार आहे की काय? अशी चर्चा आहे. कोल्हापूर जिल्ह्याची नियोजन समितीची बैठक रविवारी होणार आहे.

तत्कालीन पालकमंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी नियुक्त केलेली समिती उद्या बरखास्त होणार की मुदतवाढ मिळणार याकडे लक्ष आहे. मात्र शिंदेंच्या सेनेला पालकमंत्री पद गेल्याने आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांना घेण्याच्या देखील हालचाली आहेत. त्यामुळे नियोजन समितीच्या मंडपात शिंदेंची सेना आपलेच वाढती ठेवणार का? याची चर्चा आता जोरात सुरू आहे.

कोणत्याही क्षणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजू शकतो. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विकासकामे करण्याची अपेक्षा इच्छुक उमेदवारांना आहे, कोल्हापूर, इचलकरंजीसह,जिल्हा परिषद इच्छुक उमेदवार आता नियोजन वर जाण्याच्या तयारीत आहेत. आपल्याकडे नियोजन घेण्यासाठी त्यांच्याकडे विनंती वजा कळवळ सुरू आहेत. पालकमंत्री शिवसेनेचे (शिंदे गट) असल्याने निधी वाटपात त्यांचे पारडे जड असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Kolhapur Politics
Top 10 News : शिवसेना ठाकरेंचे सहा खासदार भाजप फोडणार ; भारत मिशन मोडमध्ये वाचा 2047 पर्यंतचा रोडमॅप - महत्त्वाच्या घडामोडी

यंदा कोल्हापूर जिल्ह्याला पहिल्यांदाच शिवसेनेचे पालकमंत्री पद मिळाले आहे. त्यात पदाची आणि पालकमंत्री पदाची धुरा नव्यानेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर सांभाळत आहेत. विधानसभा निवडणुकीत मदत केलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांना जिल्हा नियोजन समितीवर घेऊन त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न केला जातो. मात्र यंदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रखडल्याने आणि लावणी वर पडल्याने अशा इच्छुकांची नजर नियोजन समितीवर आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषद सदस्यांमधून येणाऱ्या सदस्यांची पदे रिक्त राहणार आहेत. मात्र, अशासकीय सदस्यांमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर याचे अध्यक्ष असल्याने त्यांचे या निवडी वर्चस्व राहणार आहे. त्यामुळे सर्दी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Kolhapur Politics
CM Fadnavis On Raigad and Nashik Dispute : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या वादावर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, 'लवकरच...'

तत्पूर्वी या नियोजन समितीच्या बैठकीला कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन पालकमंत्री, मंत्री, बारा आमदार, तीन खासदार उपस्थित राहणार आहेत. 6 जुलै 2024 ला झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्त व इतिवृत्तावरील कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत 20 जानेवारी 2025 अखेरील खर्चाचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2024-25 मधील पुनर्विनियोजनास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)2025-26 प्रारूप आराखड्यास मान्यता देणे व आयत्या वेळेचे विषय होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com