CM Fadnavis On Raigad and Nashik Dispute : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या वादावर फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, 'लवकरच...'

Dispute over guardianship of Raigad and Nashik : राज्यातील रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून जोरदार वादळ निर्माण झाले आहे. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रस्सीखेच होत आहे.
CM Fadnavis Ajit Pawar Sunil Tatkare Eknath Shinde Bharat Gogawale
CM Fadnavis Ajit Pawar Sunil Tatkare Eknath Shinde Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरु आहे. यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. उलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आपला दावा सांगत आहे. तर मंत्री भरत गोगावले आणि त्यांचे आमदार रायगडचं पालकमंत्रिपद मिळवणारच असे ठाम म्हणत आहेत. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर मोठे वक्तव्य केलं आहे. यामुळे रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावर पडदा पडणार आहे.

रायगड आणि नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळण्यासाठी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे. रायगडसाठी मंत्री भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी भाजप आग्रही आहे. पण येथे शिवसेना शिंदे गटाचे दादा भूसे आग्रही आहेत. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे यांचे नाव पुढे केले जात असून नाशिकमध्ये पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान आज (ता. 31) पुण्यात विश्व मराठी संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार सुद्धा उपस्थित यावेळी उपस्थित होते. तिन्ही प्रमुख एकाच व्यासपिठावर आल्याने रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर तोडगा निघेल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

या कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री फडणवीस रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भाष्य करताना सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांनी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री प्रश्न लवकरच सोडवला जाईल, असं सांगितलं आहे.

CM Fadnavis Ajit Pawar Sunil Tatkare Eknath Shinde Bharat Gogawale
Maharashtra Politic's : मंत्रिमंडळ बैठकीत रायगड, नाशिकच्या पालकमंत्रिपदाची चर्चा; सीएम, डीसीएमकडून ‘या’ पर्यायाची चाचपणी?

राज्यातील पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्या काहीच दिवसांपूर्वी झाल्या होत्या. पण रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत धूसफूस चव्हाट्यावर आली होती. मंत्री अदिती तटकरे यांच्या नियुक्तीवरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला होता. तर थेट मंत्री भरत गोगावले यांनीच उघड उघड विरोध केला होता.

फक्त विरोधच नाही तर गोगावले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती. तर कोणत्याही परिस्थित आपण रायगडचे पालकमंत्रिपद मिळवूच असे संकेत दिले होते. यानंतर हा वाद अधिकच चिघळला होता.

CM Fadnavis Ajit Pawar Sunil Tatkare Eknath Shinde Bharat Gogawale
Mahayuti Politics : 'मी गरीब असल्यानं गरीब जिल्ह्याचं पालकत्व दिलं...' म्हणत अजितदादांच्या नेत्याने व्यक्त केली खंत

दरम्यान आता रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून तडजोड केली जात असून यात भाजपने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या वादावर तोडगा काढताना शिंदेंकडे असलेलं मुंबईचं पालकमंत्रीमद भाजपला सोडावे अशी मागणी केल्याची माहिती मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com