Koregaon News : राज्यात सरकार पुरस्कृत दहशतवाद; उपमुख्यमंत्र्यांकडूनच काडतुस घुसण्याची भाषा : शशिकांत शिंदे

Shashikant Shinde संघटीतपणे आवाज उठविण्याची आवश्यकता असून, सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचावे, असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
Shashikant Shinde, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Shashikant Shinde, Devendra Fadanvis, Eknath Shindesarkarnama

-राजेंद्र वाघ

Koregaon News : सध्या राज्यामध्ये सरकार पुरस्कृत दहशतवाद सुरू असून गृहमंत्रीपद सांभाळणारे उपमुख्यमंत्रीच DyCM जर काडतुसाची आणि घुसण्याची भाषा करत असतील. तर राज्यात कायदा, सुव्यवस्था Law and order कशी राहिल. त्यासाठी संघटीतपणे आवाज उठविण्याची आवश्यकता असून सध्याच्या या अशा परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी केले आहे.

यासंदर्भातील पत्रकात आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे, की सरकारमध्ये अधिकाराचा वापर होत होता; परंतु आता सर्रासपणे कार्यकर्त्यांचा व गुंडांचा वापर करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचे समर्थन देखील केले जात आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. राज्य चालविण्याची जबाबदारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर असताना मुख्यमंत्र्यांच्याच ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक वर्षे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या महिला शिवसैनिकास मारहाण होते. संबंधित महिलेवर उपचार सुरु असतानाही तिला मारहाण केली जाते. त्याबद्दल कोणत्याही प्रकारची वाच्यता मुख्यमंत्र्यांकडून केली जात नाही.

उलटपक्षी तिच्यावरच गुन्हा दाखल केला जातो, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. एका महिला भगिनीवर उपचार सुरू असताना तिला लाथा, बुक्यांनी मारहाण करुन तिच्यावरच कारवाई केली जात आहे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये नवीन पाहायला मिळत आहे. सगळीकडेच अशा प्रकारचा दहशतवाद सुरु आहे. उपमुख्यमंत्र्यांकडून सांगितले जाते, की जनसेवेसाठी सत्ता हातामध्ये असणे गरजचे असते; परंतु 'तोंडावर एक व मागे एक', अशा पध्दतीने जनसेवा नव्हे, तरे सत्तासेवा करण्याचे काम सुरु आहे.

Shashikant Shinde, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Koregaon market committee : पक्षाअंतर्गत खो-खो, कबड्डीचा खेळ नको; रामराजे नाईक-निंबाळकर स्पष्टच बोलले

गृहमंत्रीपद सांभाळणारे उपमुख्यमंत्रीच जर काडतुसाची आणि घुसण्याची भाषा करत असतील, तर कायदा, सुव्यवस्था कशी राहील0 सामान्य जनतेला आतापर्यंत कायद्याचा धाक दाखविण्याचा प्रयत्न होत होताच; परंतु आता शासनाचा धाक दाखविला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

Shashikant Shinde, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Shashikant Shinde News : सरकार वाचवण्यासाठी आमदारांचे लाड, प्रत्येकजण स्वतःला गृहमंत्री समजतोय..

बंडखोरी केलेले आमदार, अधिकारी, दहशतीखाली होते व आता तर जनतेवरच दहशत माजविण्याचे कार्य सुरु आहे. सगळीकडे गुंडाराज सुरु आहे. अधिकाऱ्यांवर प्रचंड ताण पडत असून, त्यांना नियमबाह्य कामे करावयास सांगितले जाते. तशा पध्दतीने फोन अधिकाऱ्यांना केले जातात. त्यामुळे भविष्यकाळामध्ये फार मोठी वाईट परिस्थिती निर्माण होणार आहे. त्यासाठी संघटीतपणे आवाज उठविण्याची आवश्यकता असून, सध्याच्या या अशा परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचावे, असे आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.

Shashikant Shinde, Devendra Fadanvis, Eknath Shinde
Satara Congress : काँग्रेसच्या पोस्ट कार्ड कम्पेनिंगला प्रारंभ; मोदींना एक लाख पत्रे पाठवणार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com