Pandharpur Politic's : ‘चंद्रभागा कारखाना लढू नका; विधानसभेला पंढरपूरऐवजी माढ्याचा विचार करा’ : भालके-काळेंकडून अभिजित पाटलांना अटी

विठ्ठल परिवाराच्या बैठकीतील अटी ऐकून त्या मान्य नसल्याचे सांगत विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे बैठक सोडून निघून गेले
Bhagirath Bhalke, Kalyanrao Kale, Abhijeet Patil
Bhagirath Bhalke, Kalyanrao Kale, Abhijeet PatilSarkarnama

पंढरपूर : बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने पंढरपुरात (Pandharpur) गुरुवारी (ता. २० एप्रिल) मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) -भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी माघार घेत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारकांना पाठिंबा दिला. बाजार समितीची निवडणूक विठ्ठल परिवार म्हणून एकत्रित लढवण्यासाठी बोलावलेली बैठक अटी आणि शर्तींनी गाजली. वसंतराव काळे कारखान्याची निवडणूक लढवू नका, अशी अट काळेंनी, तर भालकेंनी तुम्ही पंढरपूरऐवजी माढ्याचा विधानसभेसाठी विचार करा, असे सूचविले. मात्र, या सूचना मान्य नसल्याचे सांगून अभिजिती पाटील हे बैठक सोडून निघून गेल्याचे सूत्रांनी सांगितले. (Meeting of the Vitthal parivar was fruitless due to conditions)

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये दुभंगलेला विठ्ठल परिवार बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. पंढरपूर येथील शासकीय निवासस्थानामध्ये गुरुवारी दुपारी कल्याणराव काळे, भगीरथ भालके आणि अभिजीत पाटील हे तिघेही नेते एकत्रित आले होते. दरम्यान काही मुद्द्यावर एकमत न झाल्याने बैठक निष्फळ ठरली.

Bhagirath Bhalke, Kalyanrao Kale, Abhijeet Patil
Bazar Samiti Election : माढ्यात शिंदे बंधू विरोधात सावंत बंधूंमध्ये काँटे की टक्कर : संजय शिंदेंच्या उमेदवारीने चुरस; साठेंची भूमिका निर्णायक

बाजार समितीची निवडणूक विठ्ठल परिवार म्हणून एकत्रित लढवण्यासाठी या नेत्यांमध्ये बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, वसंतराव काळे साखर कारखाना आणि पंढरपूर विधानसभा या निवडणुकांवरही या नेत्यांमध्ये चर्चा झाली.

Bhagirath Bhalke, Kalyanrao Kale, Abhijeet Patil
Bazar Samiti Election : मंगळवेढ्यात काका-पुतण्याची बाजी : भालके-परिचारकांच्या समविचाराचे स्वप्न धुळीस

‘सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या निवडणुकीत तुम्ही लक्ष घालू नका’, अशी अट राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी ठेवली. त्यानंतर भगीरथ भालके यांच्याकडूनही ‘पंढरपूर विधानसभा मतदासंघाऐवजी तुम्ही माढ्याचा विचार करा’ असे अभिजीत पाटील यांना सुचविण्यात आले. मात्र, दोन्ही नेत्यांच्या या सूचना आपणास मान्य नसल्याचे सांगून अभिजीत पाटील यांनी बैठक सोडल्याची कार्यकर्त्यामध्ये चर्चा सुरु आहे.

Bhagirath Bhalke, Kalyanrao Kale, Abhijeet Patil
Sangola News : गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर सांगोल्यात बिनविरोधची परंपरा खंडीत : नेत्यात एकी; कार्यकर्त्यांत बेकी

अभिजित पाटील निवडणूक लढण्यावर ठाम

दरम्यान, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी माजी आमदार प्रशांत परिचारक गटाच्या पाच जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरीत १३ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या निवडणुकीतून राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे व भगीरथ भालके यांच्या गटाने ऐनवेळी माघार घेतल्याने निवडणुकीतील हवाच निघून गेली आहे. मात्र, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील गटाने परिचारक गटाच्या विरोधात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने निवडणुकीत ट्विस्ट आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com