Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तेचं सिंहासन डळमळत राहणार; बाळुमामांच्या यात्रेत मोठं भाकित

Maharashtra Political news : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाकडे आता केवळ राज्य किंवा भारताचेच नाही संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
Maharashtra Political Crisis
Maharashtra Political CrisisSakarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाकडे आता केवळ राज्य किंवा भारताचेच नाही संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. देशभरातून राजकीय तज्ञ्ज आपापले अंदाज वर्तवत आहेत. त्यामुळे या निर्णयाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदमापुरातील संत बाळूमामाच्या जागरानिमित्त भाकणूक (भाकित) पार पडली. यात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरही वेगवेगळी भाकीतं वर्तवण्यात आली आहेत.

संत बाळूमामांचे भक्त व मुख्य पुजारी कृष्णात डोणे- वाघापूरकर यांनी ही भाकणूक केली आहे.विशेष म्हणजे बाळूमामांच्या भक्तांमध्ये या भाकणूकीविषयी प्रचंड उत्सुकता असते. राज्याच्या सध्याच्या अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेती, सामाजिक, आर्थिक, राजकीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोंडीवर भाष्य करण्यात आलं.

Maharashtra Political Crisis
Nitin Gadkari news Update: नितीन गडकरींना धमकी; बंगळूरमधून तरुणी ताब्यात..

राज्याच्या राजकारणातील भाकणुकीकडेही अनेकांचं लक्ष लागलं होतं. ' येत्या काळात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल. महाराष्ट्रातील छोटे पक्ष राजकारणात आघाडी घेतील, महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचं सिंहासन डळमळत राहील, असं भाकीत वर्तवण्यात आलं.याशिवाय, राजकीय नेते सत्ता संपत्तीच्या मागे धावतील. सत्तेच्या बाजारात नेते विकले जातील.राजकारणात मोठा गोंधळ होईल. हाणामारीचे प्रसंग होतील. येणाऱ्या काळात राजकीय नेते घोटाळ्यात अडकतील, तुरुंगात जातील. असं भविष्यही वर्तवण्यात आलं.

याशिवाय वातावरणातील बदलाचा शेतीला मोठा फटका बसणार असल्याचं भविष्य बाळूमामांच्या मंदिरात वर्तवण्यात आलं. उन्हाळ्याचा पावसाळा होईल अन् पावसाळ्याचा उन्हाळा होईल.नदीकाठावरील जमीन ओसाड पडेल.

कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठं भगदाड पडेल. ज्याच्याकडे धान्य असेल तो शहाणा असेल. वैरणीला सोन्याची किंमत येईल.धान्यांची व वैरणीची लुटमार होईल. ऊसाचं चिपाड होईल.ऊसाच्या कांड्याने व दुधाच्या भांड्याने राज्यात गोंधळ माजेल. व्यापारी शेतकऱ्याला लुबाडतील, शेतकरी वर्गांची चिंता अजून वाढेल, असंही यावेळी सांगण्यात आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com