Jawali Market Committee News: जावली बाजार समितीत तीन आमदारांची प्रतिष्ठापणाला; १८ जागांसाठी १२१ अर्ज

Shashikant Shinde गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर जावलीचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे वर्चस्व अबाधित आहे, मात्र गेल्या पाच वर्षात तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत.
Shashikant Shinde, Makrand Patil, Shivendraraje Bhosale
Shashikant Shinde, Makrand Patil, Shivendraraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

-महेश बारटक्के

Jawali Market Committee Election : जावळी- महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी तब्बल १२१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी, आमदार शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje गट, आमदार मकरंद पाटील Makrand Patil गट, शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना, दीपक पवार गट या सर्व गटांकडून वेगवेगळे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे, राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील व शशिकांत शिंदे Shashikant shinde या तीन आमदारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे, ज्ञानदेव रांजणे, संजय गायकवाड, सौरभ शिंदे, अमित कदम, संदीप पवार, एकनाथ ओंबळे, मालोजीराव शिंदे, जयदीप शिंदे, बाबुराव संकपाळ, हणमंतराव पार्टे आदी नेते कार्यालयाच्या आवारात तळ ठोकून होते.

सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारण मतदारसंघातील सात जागांसाठी ५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. महिला गटात दाोन २ जागांसाठी नऊ अर्ज, इतर मागासवर्ग प्रवर्गात एका जागेसाठी पाच अर्ज, विमुक्त जाती भटक्या जमाती गटात एक जागेसाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण गटात २ जागेसाठी २७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

अनुसूचित जाती गटात एका जागेसाठी आठ अर्ज दाखल झाले आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटात एका जागेसाठी पाच अर्ज दाखल झाले आहेत. अडते व व्यापारी मतदारसंघात दाोन जागांसाठी आठ अर्ज दाखल झाले आहेत. हमाल व मापाडी मतदारसंघात एका जागेसाठी दाोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

Shashikant Shinde, Makrand Patil, Shivendraraje Bhosale
Jawali News: जावळीकरांसाठी 'गुड न्यूज': प्रतापगड- किसन वीर कारखान्यांतील करार संपुष्टात

बाजार समिती आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी आता जावली तालुक्यातील नेत्यांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर जावलीचे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे वर्चस्व अबाधित आहे, मात्र गेल्या पाच वर्षात तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत व तालुक्याचे नेतृत्व भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे असल्याने यावेळच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

सध्या ही बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने सत्तांतर करून ती भाजपाच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकत्यांकडून होऊ शकतो, तसेच जिल्हा बँकेतील निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा झालेला पराभव आमदार शिंदे यांच्या फारच जिव्हारी लागल्याने, त्याचा परिणामही येऊ घातलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे.

Shashikant Shinde, Makrand Patil, Shivendraraje Bhosale
Wai : कोकणातील या रस्त्यासाठी मकरंद पाटलांचे नितीन गडकरींना साकडे

महाबळेश्वर तालुक्याचे नेतृत्व आमदार मकरंद पाटील यांच्याकडे आहे, जावली बाजार समिती ही महाबळेश्वरशी संलग्न असल्याने आमदार मकरंद पाटील यांची भुमिकाही या निवडणुकीत निर्णायक राहणार आहे, एकुणच आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे व आमदार मकरंद पाटील हे तीनही आमदार आपल्याच कार्यकत्यांची वर्णी लागावी यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com