Twin Sisters Marriage : जुळ्या बहिनींशी लग्न करणाऱ्या तरुणाचे धक्कादायक सत्य समोर

Twin Sisters Marriage : तरुणाने जुळ्या बहिनींशी केलेल्या लग्नात मोठा ट्विस्ट
Rinky Pinky Atul marriage
Rinky Pinky Atul marriageSarkarnama
Published on
Updated on

Twin Sisters Marriage : सोलापूरमधील (Solapur) अकलूजच्या एका तरुणाने जुळ्या बहिनींशी केलेल्या लग्नाची राज्यभर चांगलीच चर्चा रंगली. मात्र आता या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. त्यामुळे एका तरुणाने जुळ्या बहिनींशी केलेलं लग्न पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

अकलूजच्या या तरुणाने मुंबईच्या (Mumbai) जुळ्या बहिणींशी लग्न केलं. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची थेट राज्य महिला आयोगाने दखल घेत चौकशीचे आदेशही दिले होते. त्यानंतर या तरुणाची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

Rinky Pinky Atul marriage
Gujarat Election 2022 : 'हीच' रणनीती भाजपला गुजरात निवडणुकीत पोहचविणार शंभरीपार!

अतुल अवताडे असं या तरुणाचे नाव आहे. याआधीच त्याचं पहिलं लग्न झालेलं असून त्याच्या पहिल्या पत्नीनेच राज्य महिला आयोगाकडे (State Commission for Women) याबाबतची तक्रार दाखल केली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता अतुल चांगलाच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. एवढंच नाही तर अतुलसोबतच दोन्ही जुळ्या बहिणींवर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Rinky Pinky Atul marriage
मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाल्या सुषमा अंधारे पहा....

अतुलने जुळ्या बहिणींशी लग्न केल्याने या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. तर माध्यमांमध्ये देखील या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या. मात्र आता या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट येत जुळ्या बहिनींसोबत लग्न करणारा तरुण धोकेबाज निघाला असल्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे.

Rinky Pinky Atul marriage
'वंचित'ला हवी मुंबईत 'एन्ट्री'; ठाकरेंचा हात धरून आंबेडकरांचा होणार फायदा : अन्...

दरम्यान, या जुळ्या बहिणींनी एकाच मुलाबरोबर लग्न केल्यामुळे सोशल मीडियावर (Social media) मिम्सचा अक्षरश: पाऊस पडला. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची दखल घेत राज्य महिला आयोगानेही चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर आता अतुलचे आधीच एक लग्न झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने पुन्हा या लग्नाची चर्चा होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com