मुरकुटेंच्या सासरवाडीत गडाख गटाचा विजय

मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) व भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) यांच्यात सत्ता संघर्ष आहे.
Gadakh group
Gadakh groupSarkarnama
Published on
Updated on

सोनई ( जि. अहमदनगर ) - नेवासे तालुक्यात राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख ( Shankarrao Gadakh ) व भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे ( Balasaheb Murkute ) यांच्यात सत्ता संघर्ष आहे. बाळासाहेब मुरकुटे यांची सासरवाडी असलेल्या कांगोणी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गटाने मुरकुटे यांच्या मेव्हण्याच्या जनसेवा मंडळाचा पराभव केला आहे. 40 वर्षांनंतर झालेल्या सत्तांतरची संपूर्ण तालुक्यात चर्चा रंगली आहे. ( The victory of the Gadakh group in the village of Murkute's father-in-law )

कांगोणी सेवा संस्थेत माजी आमदार मुरकुटे यांचे सासरे कारभारी शिंदे यांची चाळीस वर्षापासून सत्ता होती. अलीकडच्या 10 वर्षांपासून मुरकुटे यांचे मेव्हणे आप्पासाहेब (बंडू) शिंदे संस्थेचा कारभार पाहत होते. ग्रामपंचायत सुध्दा याच गटाच्या ताब्यात असल्याने मंत्री गडाख गटातील कार्यकर्त्यात सल होती. अनेकदा विरोध करुनही सेवा सोसायटी ताब्यात येत नव्हती. यावेळच्या निवडणुकीत गडाख गटातील सर्व कार्यकर्त्यानी विशेष नियोजन करुन 13 पैकी 13 जागा 30 ते 50 मतांच्या फरकाने जिंकल्या आहेत.

Gadakh group
शंकरराव गडाख म्हणाले, हा हल्ला म्हणजे मला राजकारणातून संपविण्याचा कट

आज सायंकाळी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गडाख गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व घोषणा देवून भर पावसात जल्लोष साजरा केला. माजी आमदार मुरकुटे यांच्या अनेक जवळच्या कार्यकर्त्यानी हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्यातील अनेक गावात कोंडी करुन मुरकुटे यांच्या गावातील सेवा सोसायटीत गडाख गटाने मुसंडी मारल्यानंतर आता त्यांची सासरवाडी असलेल्या कांगोणीत गडाख गटाने बाजी मारली आहे.

Gadakh group
बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरेंनी मंत्री शंकरराव गडाखांचा राजीनामा घ्यावा...

विजयी उमेदवार

अशोक कर्डिले, रमेश कराळे, रामभाऊ कराळे, कारभारी कोकाटे, महेश ठोंबळ, सुनील रौदळ, ज्ञानदेव शिंदे, दुर्योधन सोनवणे, अलका गोरक्षनाथ ठोंबळ, हिरा पोपट रौदळ, मच्छिंद्र कर्डिले, सुभाष भालेकर, मच्छिंद्र वडागळे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com