Balasaheb Thorat News : 'तर मी ती चूक होऊच दिली नसती'; नाशिक निवडणुकीसंदर्भात थोरातांचा मोठा खुलासा ...

Nashik Graduate Constituency: नाशिक पदवीदर निवडणुकीत सत्यजीत तांबेंना केलेल्या बंडखोरीबाबत बाळासाहेब थोरात यांनी आतापर्यंत मौन बाळगले होते.
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक पदवीदर निवडणुकीत सत्यजीत तांबेंना केलेल्या बंडखोरीबाबत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आतापर्यंत मौन बाळगले होते. त्यात दुसरीकडे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशीही असणारे मतभेद टोकाला गेले होते. थोरात यांनी या सर्व घटना क्रमाबाबत दिल्लीत पक्षश्रेष्ठींना पत्राद्वारे कळवले होते. या पत्राची दखल घेत काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यानंतर संगमनेरमध्ये आयोजित सभेत थोरात यांनी गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांवर खुलासे केले आहेत.

नाशिक पदवीधर पोटनिवडणुकीच्या त्या 15 दिवसांच्या काळात जे काही झालं. आपल्याला ज्या पद्धतीने मांडणी करायची होती. ज्या काही टेक्निकल चुका झाल्या, पण जी काही चूक झाली ती झाली. माझा हात ठिक असता तर ती ही चूक मी होऊच दिली नसती, कारण मीच नाशिकला राहिलो असतो, असा खुलासा कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

Balasaheb Thorat
Sanjay Raut News: ''...तर फडणवीस-अजित पवारांचं सरकार ७२ तासांत कोसळलं नसतं!''; राऊतांचं प्रत्युत्तर

भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना सत्यजीतने यात्रेत खूप काम केले. सत्यजीतची टीम राहिली काँग्रेसमध्ये आणि तू एकटा राहिला. आता तुलाही करमणार नाही, त्या पोरांनाही करमणार नाही आणि काँग्रेसलाही करमणार नाही. त्यामुळे आता तुझं अपक्ष किती दिवस टिकतं ते आता आम्हीही पाहू, असा प्रेमळ सल्लाही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सत्यिजत तांबेना यावेळी दिला.

नाशिक पदवीधर पोटनिवडणुकीच्या काळात जे काही घडलं त्याबाबत मी पक्षश्रेष्ठींना लिहीलं. जी व्यथा होती ती लिहीली. मी पत्रातून जी मांडणी केली त्याची एच के पाटील यांनीही दखल घेतली. काल ते आल्यानंतर आमची सविस्तर चर्चा झाली. त्या दिवशी संगमनेरच्या जाणता राजा मैदानावर बोलताना तुम्ही सर्वांनी ऐकलं आपला विचार म्हणजे काँग्रेसचा विचार. आपला वेगळा विचार असूच शकत नाही. त्या विचाराने काम करणं हे आपण करत राहणार आहोत. त्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही. ही वस्तुस्थिती आहे.

Balasaheb Thorat
Sharad Pawar News : फडणवीसांचा गौप्यस्फोट पवारांनी नाकारला

याच वेळी त्यांनी नाना पटोले यांच्या असलेल्या मतभेदांवरही भाष्य केलं. आमच्या पक्षांतर्गत जर काही गोष्टी असतील तर त्या पक्षांतर्गतच सोडवायच्या असतात. जमत नसेल तर पक्षांतर्गत आपल्या समस्या मांडायला हव्यात. त्या पद्धतीनेच वागलं पाहिजे या मताचा मी आहे. माझ्या पत्राची दिल्लीनेही दखल घेतली. त्यामुळे काल एच. के. पाटील खास दिल्लीहून आले होते. त्यांच्यासोबत मी जवळपास एक-दीड तास चर्चा केली.आता या सर्व गोष्टी पाहता पुढच्या कालखंडात काँग्रेस ला पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्याला करावं लागणार आहे, असं या निमित्ताने मी तुम्हाला सांगतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com