Satara BJP Politic's : सातारा भाजप जिल्हाध्यक्षपदी निष्ठावंतांना संधी की नव्यांचा राज्यभिषेक?; उदयनराजेंच्या निकटवर्तीयासह ही नावे आघाडीवर...

Satara News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळविलेले यशाची मालिका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे, त्या दृष्टीकोनातूनच विविध समित्या आणि त्यांचे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

Satara, 24 April : भारतीय जनता पक्षाकडून सध्या संघटनात्मक बांधणीचे काम जोरात सुरू आहे. मंडल अध्यक्ष आणि इतर नियुक्त्याही केल्या जात आहेत, त्यामुळे येत्या एप्रिलअखेर सातारा जिल्हाध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. त्यासंदर्भाने पक्षीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. इच्छुकांकडून आमदार, खासदार आणि भाजपच्या मंत्र्यांकडे फिल्डिंग लावण्यात आली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याबरोबरच खासदार उदयनराजेंचे निकटवर्तीय तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, किसान आघाडीचे रामकृष्ण वेताळ, पंचायतराज आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष रणजित फाळके, दत्ताजी थोरात, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांची नावे आघाडीवर आहेत. या निष्ठावंतांना संधी मिळते की पक्षात नव्याने येणाऱ्यांना पायघड्या घातल्या जातात, हे पाहावे लागणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपच्या (BJP) नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये पक्षसंघटनेतील नेत्यांनाही संधी देण्यात आली आहे, त्यामुळे एक व्यक्ती एक पद या नियमानुसार महसूलमंत्री झालेले चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे विधानसभेतील यशानंतर भाजपकडून संघटनेतही फेरबदल करण्यास सुरुवात केली असून बावनकुळे यांच्या जागेवर लवकरच नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

प्रदेशाध्यक्ष नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जिल्हाध्यक्ष, संघटनेतील विविध समित्या आणि त्यांचे अध्यक्ष बदलाबाबत प्रक्रिया वेगात सुरू आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, त्या दृष्टीने जिल्हाध्यक्षपद महत्वपूर्ण ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत कधी नाही ते सातारा (Satara) जिल्ह्यात भाजपला यश आले आहे, तर विधानसभा निवडणुकीतही सर्वच सर्व जागा महायुतीने जिंकल्या आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळविलेले यशाची मालिका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे, त्या दृष्टीकोनातूनच विविध समित्या आणि त्यांचे अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. येत्या एप्रिलअखेरपर्यंत सातारा जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे, त्यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत.

BJP
Dr. Shirish Valsangkar : दीड वर्षापूर्वी एका डॉक्टरांसंदर्भात घेतलेला निर्णय डॉ अश्विन वळसंगकरांनी आपल्याच वडिलांबाबत का घेतला नाही?

विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह सुनील काटकर, रणजित फाळके, जयकुमार शिंदे, रामकृष्ण वेताळ, दत्ताजी थोरात आदींची नावे जिल्हाध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत. कदम यांनीही पुन्हा एकदा जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. पण, सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे यांच्यासोबत झालेला वाद अडथळा ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, खासदार उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय असलेल्या सुनील काटकर यांचेही नाव चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत काटकर यांनी पक्षाचे संयोजकपद सांभाळले आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे खासदार उदयनराजेंचा संपूर्ण पाठिंबा काटकर यांना आहे, त्यामुळे काटकर यांचे नाव सर्वांत आघाडीवर आहे.

पंचायतराज आघाडीच्या माध्यमातून काम करताना रणजित फाळके यांनी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी उत्तर समन्वय राखलेला आहे. केंद्र सरकारची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविण्यासाठी त्यांनी प्रत्येक तालुक्यात खास प्रयत्न केले आहेत. माढा लोकसभा मतदारासंघ, तसेच फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात जयकुमार शिंदे यांनी भाजपची पुनर्बांधणी केली आहे.

BJP
Top 10 News : पाकिस्तानवर रात्रीत वॉटर स्ट्राईक, दहशतवाद्यांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा देणार, पर्यटकांच्या मदतीसाठी भाजप-शिवसेनेत चढाओढ

किसान आघाडीच्या माध्यमातून रामकृष्ण वेताळ यांनी पक्षासाठी शेतकऱ्यांच्या पातळीवर संघटन उभे केलेले आहे. दत्ताजी थोरात हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे काम निष्ठेने करत आहेत, त्यामुळे निष्ठावंताला संधी मिळते की पक्षात नव्याने आलेल्यांना पद दिले जाते हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com