Udaysinh Undalkar : अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे उदयसिंह उंडाळकरांनी सांगितले हे कारण...

Ajit Pawar NCP News : विलासकाकांनी सलग 35 वर्षे कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. त्या माध्यमातून त्यांनी मतदार संघाचा त्यांनी चेहरा बदलला. वारणेचे पाणी कृष्णा नदीला मिळवून त्यांनी पहिला नदीजोड प्रकल्प सातारा जिल्ह्यात साकारला
Udaysinh Patil Undalkar-Ajit Pawar
Udaysinh Patil Undalkar-Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Karad, 15 April : कऱ्हाड दक्षिणचे काँग्रेसचे मातब्बर नेते तथा रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या शनिवारी (ता. १९ एप्रिल) प्रवेश होणार आहे. उंडाळकर यांनी काँग्रेस का सोडली, याची चर्चा रंगली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे कारणही सांगितले आहे.

सातारा (Satara) जिल्ह्यात सामान्य कार्यकर्त्यांचे संघटन उभे केलेले आहे. त्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, तसेच, त्यांना राजकीय ताकद देण्यासाठी काँग्रेसच्या विचारांशी साधर्म्य असलेल्या आणि सत्तेतील पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे उंडाळकरांनी स्पष्ट केले आहे. उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे शनिवारी (ता. १९) आयोजन करण्यात आले आहे.

माजी सहकारमंत्री (स्व) विलासराव उंडाळकर यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याकडून राजकारणाचे धडे घेऊन सामान्य जनतेचे नेतृत्व करत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम आयुष्याच्या अखेरपर्यंत केले. विलासकाकांनी सलग ३५ वर्षे कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले. त्या माध्यमातून त्यांनी मतदार संघाचा त्यांनी चेहरा बदलला. वारणेचे पाणी कृष्णा नदीला मिळवून त्यांनी पहिला नदीजोड प्रकल्प सातारा जिल्ह्यात साकारला. कराडबरोबरच त्यांनी सातारा जिल्ह्यातील सामान्य जनतेला सत्तेची दारे खुली करण्याचे काम सातत्याने केले, असेही अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysinh Undalkar) यांनी स्पष्ट केले.

Udaysinh Patil Undalkar-Ajit Pawar
Solapur Politics : पवारांच्या पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांचा मोठा निर्णय; भाजप आमदाराला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा

विलासकाकांना काँग्रेस पक्षांतर्गतच २०१४ च्या निवडणुकीत संघर्ष करावा लागला. मात्र, त्यानंतरही त्यांनी राजकारणातील तत्व जोपासत सर्वसामान्यांची नाळ शेवटपर्यंत तुटू दिली नाही. राज्याचे राजकारण सातत्याने बदलत आहे. राज्यात सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राज्यात आहे. सामान्य कार्यकर्त्यांचे तालुका, जिल्ह्यात उभे केलेले संघटन, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांना राजकीय ताकद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असेही उंडाळकर यांनी सांगितले.

Udaysinh Patil Undalkar-Ajit Pawar
Karad Politic's : काँग्रेस नेत्याच्या मनातलं अखेर ओठावर आलं : ‘बाळासाहेबांच्या त्रासाला कंटाळून आम्ही भाजप आमदाराला निवडून आणलं; पण ‘सह्याद्री’त त्यांनी...’

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, फलटणचे आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनाली पोळ, प्रदीप विधाते, विजयसिंह यादव, संजय देसाई आदींच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी उंडाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com