
Karad, 15 April : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विरोधक हमरीतुमरीवर आले आहेत. आमदार मनोज घोरपडे आणि इतरांमध्ये दररोज आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सह्याद्रीच्या निवडणुकीत आमदार घोरपडे हे आम्हाला दोन ते तीनच जागा द्यायला तयार होते. आता ते जे नऊ जागा देणार होतो, असे सांगत आहेत, ते सपशेल खोटं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आम्ही मनोज घोरपडेंना विधानसभा निवडणुकीत निवडून आणले. त्यांनी सह्याद्रीच्या निवडणुकीत आम्हाला साथ देणे अपेक्षित होते. पण आम्हाला साथ न देता उलट आमच्यावर आरोप केले, अशा शब्दांत काँग्रेसचे निवास थोरात यांनी भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांच्यावर हल्लाबोल केला.
कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Sahyadri sugar factory election) विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पी. डी. पाटील यांच्या पॅनेलने सर्व २१ जागा जिंकल्या आहेत. विरोधकांचे या निवडणुकीत पानिपत झाले. त्यानंतर विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. आमदार घोरपडे यांनी काँग्रेसचे निवास थोरात आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या पॅनेलला नऊ जाणार देणार होतो, असे निवडणुकीनंतर सांगत आहेत. त्याला निवास थोरात यांनी उत्तर दिले आहे.
आम्हा नऊ जागा देणार होतो, हे आमदार जे सांगत आहेत, ते खोटे आहे. आम्हाला ते दोन ते तीनच जागा द्यायला तयार होते. निवडणुकीपूर्वी आमदार मनोज घोरपडे (Manoj Ghorpade) यांना ही सुबुद्धी सुचली असती तर आता स्वाभिमानी सभासदांच्या मनातील आणि सर्वसामान्या सभासद या काखान्याचा चेअरमन झालेला दिसला असता. पण सहकारातील निवडणुका ह्या समविचारी एकत्र येऊनच लढतात. आमचा पराभव झाला असला तरी सभासदांचा कौल आम्हाला मान्य आहे. माझा उमेदवारी अर्ज बाद होण्याचाही पॅनेलवरही परिणाम झाला, असे निवास थोरात यांनी स्पष्ट केले.
थोरात म्हणाले, मुळात माजी आमदारांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून आम्ही विधानसभा निवडणुकीत मनोज घोरपडे यांना ताकदीने लढून निवडून आणले. त्यानंतर आमदार घोरपडे यांनी आम्हाला सह्याद्रीच्या निवडणुकीत मदत करणे अपेक्षित होते. पण त्यांनी आम्हाला साथ देण्याऐवजी आमच्यावरच आरोप करणे चालू केले. ते आमच्या स्वाभिमानी मनाला पटले नाही, त्यामुळे आम्ही पॅनेल उभा करण्याचा निर्णय घेतला.
सुमारे २२२१ सभासदांच्या मतदानाच्या हक्कासाठी मी लढलो, आमदारांनी त्यावर कोणतीही भूमिका घेतली नाही. मी पॅनेल उभे करावा, यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह होता, त्यांचा भूमिकेचा मला आदर करावा लागला. आमदार घोरपडे मात्र स्वतःच्या घोषणेपासून दुरावले. सह्याद्रीच्या निवडणुकीत माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य नसेल, असे सांगितले हेाते. मात्र, सत्तेची लालसा शांत बसू देत नाही, हे या निवडणुकीत दिसून आले, असेही थोरात यांनी नमूद केले.
कराड बाजार समितीची निवडणूक आम्ही पक्षविरहीत लढविली होती आणि जिंकलीसुद्धा होती. सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीतही सभासदांना परिवर्तनाची अपेक्षा होती. मात्र घडलं भलतंच. आमदारांनी सह्याद्रीच्या सभासदांच्या हितासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाने पारदर्शक कारभार करावा, यासाठी प्रयत्न करायचे सोडून आमच्यावर आरोपांची मालिका सुरु केली आहे, याचे आश्चर्य वाटते, असेही थोरात यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.