Gore Vs Ramraje : जयकुमार गोरेंनी रामराजेंना पुन्हा डिवचले : ‘निवडणूक लागली की हेच महाशय मालक असायचे; पण आता...’

Phaltan Political News : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करत, त्यांचा राजकीय प्रभाव कमी झाल्याचा दावा केला.
Jaykumar Gore-Ramraje Naik Nimbalkar
Jaykumar Gore-Ramraje Naik NimbalkarSarkarnama
Published on
Updated on

Satara, 02 August : जयकुमार गोरेचं अस्तित्व संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न आणि पणही केला. पण मी जे स्वप्न पाहिलं होतं, ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पूर्ण केलं आहे. पूर्वी सातारा जिल्हा बॅंक, जिल्हा परिषदेची निवडणूक लागली की हेच महाशय मालक असायचे. पण आज बघा काय अवस्था आहे. एक माणूस त्यांच्यासोबत राहायला तयार नाही. पण त्या अदखलपात्र माणसासाठी आपला वेळ वाया घालवू नका, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हल्लाबोल केला.

फलटण पंचायत समितीच्या कार्यक्रमात जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. तसेच माढ्यातील निंबाळकरांच्या पराभावाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, मनोमिलन तुटल्यापासून ते माझ्या विरोधात आहेत. तेव्हापासून केलेली सुरूवात पण गड्याला कळालाचं नाही. कुठं आमदारकी, कुठं खासदारकी गेली. शेवटी सत्याचा विजय असतो, ज्यांची नियत चांगली असते, त्यांच्यासोबत परमेश्वर असतो.

आज एक माणूस त्यांच्यासोबत राहायला तयार नाही. आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. पण, दुसऱ्याला शिव्या, शाप देऊन काही घडणार नाही. आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. पण आता आत्मपरीक्षणाचीही वेळ राहिलेली नाही. त्यामुळे आता डोक्याला फार ताण देऊ नये, अशी माझी विनंती आहे, असे गोरे यांनी रणजितसिंह निंबाळकरांना सांगितले.

ते म्हणाले, जिल्हा बॅंक, जिल्हा परिषदेची निवडणूक लागली की हेच महाशय मालक असायचे. पण आज बघा काय अवस्था आहे. मी मागं एकदा यमाचा जीआर सांगितला होता. पूर्वी आजोबा, पणजोबा पोटाला यायचा. मग तो नातवाला बोलायचा आणि नावरस नाव ठेवायचं, असं होतं. आता यमानं सांगितलंय की, तसलं दुकान आता बंद. तू केलं आहेस, जोपर्यंत भोगत नाही, तोपर्यंत स्मशानभूमीत जागा नाही. जे जे पाप केले आहे, ते डोळ्यांनी बघितल्याशिवाय तुला सुटी नाही. त्यामुळे ते आता उघड्या डोळ्यांना पाहायचं आहे.

सातारा जिल्ह्याची परिस्थिती वेगाने बदलत असताना आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. विधान परिषदेचा आमदार या मातीतला आहे. हे सगळं का झालं, तर या मातीतला एक सुपुत्र खासदार म्हणून निवडून येत असताना या मातीचं, शहराचं आणि या भागाचं नुकसान करण्याचे पाप त्यांनी केलं आहे. त्या पापाचे ते फळ आहे, जे पेरलं आहे, तेच उगवलं आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Jaykumar Gore-Ramraje Naik Nimbalkar
Madha Politic's : रणजितसिंह निंबाळकर आज देशाचे मंत्री असते; पण त्यांचा पराभव करणाऱ्यांना सोडणार नाही : गोरेंचा मोहिते- पाटील, रामराजेंना इशारा

ते म्हणाले, फलटणमध्ये आज वेगाने बदल होताना दिसत आहे. त्याचा नागरिकांना आनंद असेल. पंचायत समितीसाठी जो निधी लागेल, तो ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून दिला जाईल आणि त्यांना सांगा एखादं पत्र असेल तर नाही तर १९२६ मध्ये आम्ही पत्र दिलं होतं, असे ते म्हणतील. त्यामुळे आतापासूनच पत्र द्यायची तयारी ठेवा.

मला मंत्रिपद मिळून सर्वाधिक काळ निवडणुकांमध्येच गेला आहे. आता कुठं काम करायला वेळ मिळणार आहे. मी इतर मतदारसंघात पाच ग्रामपंचायत कार्यालये दिली, पण फलटणला १६ ग्रामपंचायत कार्यालये दिली. मुख्यमंत्री ग्रामसडकमधून २२ कोटींचे रस्ते दिले. ग्रामविकास विभागाकडून १०० कोटी रुपये मुख्यमंत्री सडक योजनेतून दिले जाते. हे फक्त एका वर्षाचे आहे, मी आणखी तीन वर्षे मंत्री आहे. त्यांनी त्यांच्या हयातीत जेवढं काम केलं, तेवढं आपण पाच वर्षांत करू. जन्माला आल्यापासून शेवटचा विधी लागेपर्यंत जे जे लागतं, हे माझ्या खात्यात मिळतं. त्यामुळे गावच्या विकासासाठी जे लागेल ते देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले, कदाचित माणमधील एखादं काम राहील. पण फलटणमधील एकही काम राहणार नाही. रणजित निंबाळकर आणि माझं नातं हे मैत्रीच्या पलीकडचं आहे. सगळ्या परिस्थितीत आम्ही एकत्र असतो. त्यामुळे कोणी देव पाण्यात ठेवले तरी देव काही पावणार नाही. आम्ही जो संकल्प केला आहे, तो केल्याशिवाय सोडणार नाही. आम्ही जे जे ठरवलं आहे, ते पूर्णत्वाला जाईल,याबाबत निश्चिंत राहा.

Jaykumar Gore-Ramraje Naik Nimbalkar
Jaykumar Gore : जयकुमार गोरेंबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल

दादा आता टीका बिका बंद करा. ज्यांची दखल घेण्याची गरज नाही, त्या अदखलपात्र माणसासाठी आपला वेळ वाया घालवू नका. आपल्या करण्यासाठी खूप काम आहे, त्या गोष्टी आपण करू. टीकाटिपण्णीच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं आहे, असा सल्लाही त्यांनी निंबाळकर यांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com