-राजेंद्र ननावरे
Prithviraj Chavan News : एका महत्त्वाच्या पक्षामध्ये फूट पडली असून तशाच प्रकारची फूट यापूर्वी मी तीन वेळेला पाहिली आहे. छोट्या मोठ्या प्रमाणात माणसे येतात जातात. त्यामुळे सत्तेचा गैरवापर, दबाव, दहशत, ईडी, सीबीआय याचा वापर करून काही नेते दहशतीखाली भाजपकडे गेले असले तरी माणसे शरद पवार यांना सोडून जाणार नाहीत, याचा प्रत्यय काही दिवसातच येईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या फुटीबाबत राष्ट्रवादीचे नाव न घेता व्यक्त केला.
मलकापूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे प्रमुख उपस्थित होते. आमदार चव्हाण Prithviraj Chavan म्हणाले, विधानसभा अध्यक्षापुढे एकनाथ शिंदे Ekanth Shinde गटाविरुद्ध पक्षांतर बंदीचा कारवाई चालू झालेली आहे. त्यामुळे कोणाला नोटीस पाठवायचे, कोणाला साक्षी करता बोलवायचे हे ठरवून विधानसभा अध्यक्ष त्यांची कार्यवाही करतील.
माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टाने 11 मे रोजी हा वाद विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे 90 दिवसांच्या आत त्यांना निवाडा द्यावा लागेल. म्हणजेच 10 ऑगस्टच्या सुमारास निलंबनाच्या बाबतींत विधानसभा अध्यक्षांना निवाडा द्यावा लागेल. विधानसभेचे अध्यक्ष हे घटनात्मक पदावरती बसलेले आहेत.
त्यामुळे त्यांना घटनेच्या चौकटीमध्ये राहून काम करावे लागणार आहे. ते विधी तज्ञ आहेत. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय अयोग्य आहे, असे जर कोणाला वाटत असेल तर त्यांना सुप्रीम कोर्टात जायचा मार्ग मोकळा आहे. पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे दोन तृतीयांश आमदारांना बाजूला जावे लागते.
त्यांना साधे मंत्रिमंडळाचा विस्तार करता येत नाही. विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती करता येत नाही, हे वाटते तितके सोपे नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. भाजपाला एका पक्षाची सत्ता किंवा एका पक्षाचे हुकूमशाही प्रस्थापित करायची आहे, हे मी गेली अनेक दिवसांपासून सांगत आलो आहे. कित्येक वेळेला अमित शहा म्हटले होते की काँग्रेस मुक्त.
काँग्रेसमुक्त म्हणणे म्हणजे तुम्हाला विरोधी पक्ष नको आहे. छोटे पक्ष नको आहेत. एकाच पक्षाचे सरकार पाहिजे आहे. हुकूमशाही पाहिजे. त्यामुळे देशात हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हुकुमशाहीच्या दिशेने देश नेण्याचे काम सुरू आहे. ते जाऊ द्यायचं की नाही हे जनतेच्या हातात आहे, असेही आमदार चव्हाण यांनी सांगितले.
काँग्रेस फुटीची अफवा
काँग्रेस पक्षामध्ये फुटीची शक्यता नाही. काँग्रेस पक्षामध्ये 45 आमदारांचा आमचा गट आहे. त्यातील 30-31 आमदार फुटून बाहेर जातील याची अजिबात शक्यता नाही. भाजपाच्या गोटातून खोट्या अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी विविध पक्षांमधून भाजपमध्ये गेलेल्या लोकांच्या गर्दीमध्ये कोणाला काय पद मिळणार? हे बघूया.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.