पशुखाद्य गैरव्यवहार : लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा

लालू प्रसाद यादव यांना साठ लाख रुपये दंडाचीही शिक्षा
Lalu Prasad Yadav Election.jpg
Lalu Prasad Yadav Election.jpgsarkarnama
Published on
Updated on

पाटणा/रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (वय ७३) (Lalu Prasad Yadav) यांना पशुखाद्य गैरव्यवहाराप्रकरणात (fodder scam) पाच वर्षांचा कारावास आणि ६० लाख रूपयांचा दंड अशी शिक्षा सोमवारी (ता. २१) सुनावली आहे.

Lalu Prasad Yadav Election.jpg
चारा घोटाळा प्रकरण; 'जब तक रहेगा समोसे में आलू; जेल मे रहेंगे लालू'

पशूखाद्य गैरव्यवहारातील सर्वांत मोठ्या डोरंडा कोशागार गैरव्यवहारात लालू प्रसाद यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोषी जाहीर केले होते. झारखंडमधील डोरंडा कोषागरातून १९९६मध्ये १३९.३५ कोटी रुपये अवैधरीत्या काढल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

Lalu Prasad Yadav Election.jpg
Video: 'बंगले का पाडले गेले याचं उत्तर द्या'- किरीट सोमय्या

पशूखाद्य गैरव्यवहारात चाईबासा कोशागारसंबंधी दोन, देवघर व डुमका कोशागारशी संबंधित चार प्रकरणात लालू प्रसाद यांना १४ वर्षांची शिक्षा आधीच सुनावण्यात आलेली आहे. यादव हे सध्या एम्स रुग्णालयात आहेत. तेथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते सुनावणीला हजर होते. अन्य दोषी होटवार रुग्णालयातून उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com