Eknath Shinde Politic's : सोलापुरात भाजपला एकनाथ शिंदेंची टशन; तीन ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष, तर 56 नगरसेवक विजयी

Nagar Parishad Election Result 2025 : बार्शीत शिवसेना ही भाजपसोबत होती. याउलट शिवसेनेला मोहोळ, सांगोला, दुधनीत यश मिळाले आहे. याशिवाय पंढरपूर, मंगळवेढ्यातही विजयी उमेदवारांना आमचीच साथ होती.
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 21 December : सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद आणि एक नगरपंचायतपैकी एक-दोन ठिकाणी अपवाद वगळता सगळीकडेच भाजपची सत्ता येईल, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सांगोला, दुधनी, मोहोळ या तीन ठिकाणी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. नगरपालिका निवडणुकीत भाजपनंतर 56 जागा मिळवून शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कुर्डुवाडीत नगराध्यक्ष निवडून आला असून या पक्षाला जिल्ह्यात 22 जागांवर यश मिळाले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांपैकी मैंदर्गी, पंढरपूर, मंगळवेढा, अक्कलकोट, दुधनी, सांगोला, करमाळा या आठ नगरपरिषद आाणि अनगर नगरपंचायतमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला यश मिळाले नाही. अकलूज, मैंदर्गी, अनगर, पंढरपूर, मंगळवेढ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही यश मिळाले नाही.

पंढरपूर, मंगळवेढ्यात शिवसेना लढली नव्हती. अनगर नगरपरिषद बिनविरोधच झाली होती. मैंदर्गी व अक्कलकोट या दोन्ही नगरपरिषदांमध्ये भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वात भाजपला यश मिळालेआहे. या ठिकाणी दोन्ही शिवसेनेला यश मिळाले नाही.

दोन्ही शिवसेनेचे नगरसेवक

नगरपालिका.......... उबाठा................... शिवसेना

बार्शी....................... 19......................... 06

अकलूज....................02 ........................निरंक

अक्कलकोट.................निरंक......................01

दुधनी ............................निरंक..................... 20

सांगोला.......................निरंक......................... 15

करमाळा.....................निरंक ...........................05

कुर्डुवाडी...................... 05.................................01

मोहोळ.........................01...................................08

एकूण........................ 27................................... 56

एकनाथ शिंदेंचा करिष्मा दिसला, महापालिकेतही दिसेल

भाजपने 11 नगरपरिषद आणि अनगर नगरपंचायतमध्ये स्वत:चे उमेदवार उभे केले होते. पण, त्यांना चार ठिकाणीच यश मिळाले आहे. त्यातही अनगरमध्ये भाजपचे नव्हे; तर माजी आमदार राजन पाटील यांचे यश आहे. बार्शीत शिवसेना ही भाजपसोबत होती. याउलट शिवसेनेला मोहोळ, सांगोला, दुधनीत यश मिळाले आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Solapur Politic's : करमाळ्यात दोन कुटुंबातील सहा जणांची नगरपरिषदेत एन्ट्री; पंढरपुरात मात्र मतदारांनी घराणेशाहीला नाकारले

याशिवाय पंढरपूर, मंगळवेढ्यातही विजयी उमेदवारांना आमचीच साथ होती. नगरपालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा करिष्मा पहायला मिळाला. आता महापालिका निवडणुकीतही तो दिसेल, असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी बोलून दाखवला.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Jalna Election Result : तुतारी जोरात वाजली, दानवे पिता-पुत्राला दणका; लोणीकरांनी दाखविली ताकद, टोपेंना झटका...

भालके, आवताडेंना शिंदेंचे पाठबळ

पंढरपूर नगरपरिषदेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके यांनी बाजी मारली आहे. दुसरीकडे मंगळवेढा नगरपरिषदेत सुनंदा आवताडे यांनी विजय मिळविला आहे. या दोन्ही उमेदवारांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बळ मिळाल्याचे त्यांचेच जिल्हाप्रमुख सांगत आहेत, त्यामुळे हे दोन्ही नगराध्यक्ष नेमके कोणत्या पक्षात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com