Satara News : कट्टर हिंदुत्ववादी 'टायगर'चे शिवतीर्थापुढे नमन; काय आहे कारण..?

Tiger RajaSingh छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्यास राजासिंग व इतर मान्‍यवरांनी पुष्‍पहार अर्पण करत अभिवादन केले.
MLA Tiger Rajasingh
MLA Tiger Rajasinghsarkarnama
Published on
Updated on

Tiger Rajasingh News : तेलंगण येथील कट्टर हिंदुत्‍ववादी विचारसरणीचे भाजप आमदार टायगर राजासिंग यांचे सातारा येथे जल्‍लोषी स्‍वागत करण्‍यात आले. यावेळी राजासिंग यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे दर्शन घेत अभिवादन केले.

प्रतापगड Pratapgad Fort किल्‍ला परिसरात अफजलखानाचा वध केल्‍यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी Chhatrapati Shivaji Maharaj दहा दिवसांत कोरेगाव तालुक्‍यातील चंदनवंदन गडासह ५५ गावे स्‍वराज्‍यात घेतली होती. या घटनेचा विजयोत्‍सव साजरा करण्‍यासाठी श्री. शिववंदनेश्‍‍वर प्रतिष्‍ठानच्‍या वतीने येथे दरवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात येते.

यंदाच्‍या कार्यक्रमासाठी आमदार टायगर राजासिंग यांना निमंत्रित करण्‍यात आले होते. त्‍यांचे सकाळी अकराच्या सुमारास बाँम्बे रेस्‍टॉरंट परिसरात आगमन झाले. याठिकाणी त्‍यांचे भाजपसह इतर हिंदुत्ववादी संघटनांच्‍या वतीने त्‍यांचे स्‍वागत करण्‍यात आले. त्‍यानंतर राजासिंग व इतर मान्‍यवर पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळा परिसरात आले.

याठिकाणी शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्यास राजासिंग व इतर मान्‍यवरांनी पुष्‍पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्‍यात आला. याठिकाणी प्रीतम कळसकर व इतरांनी त्‍यांचा पेढ्यांचा हार तसेच पगडी प्रदान करत सत्‍कार केला.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Tiger Rajasingh
Prakash Ambedkar On BJP : राज्यात भाजपला लोकसभेच्या 30 जागांवरच रोखा; आंबेडकरांचं आवाहन...

सातारा येथील सत्‍कार स्‍वीकारल्‍यानंतर राजासिंग चंदनवंदन गडावर आयोजित कार्यक्रमासाठी रवाना झाले. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्‍यक्ष विक्रम पावसकर, जिल्‍हाध्‍यक्ष धैर्यशील कदम, कराड उत्तरचे नेते मनोज घोरपडे यांच्‍यासह प्रीतम कळसकर व इतर मान्‍यवर उपस्‍थित होते.

Edited By : Umesh Bambare

MLA Tiger Rajasingh
Satara Loksabha : सातारा लोकसभेसाठी काँग्रेसनेही ठोकले शड्डू ; पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com