
Solapur, 26 January : सोलापुरातील चाळीस वर्षीय तरुणाचा जीबीएसमुळेच मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालानुसार स्पष्ट होते. मात्र, खात्रीसाठी त्याचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित रुग्णाचा मृत्यू जीबीएसमुळेच झाला का, हे स्पष्ट होते. पण, वेळेत उपचार हेच जीबीएसवरील रामबाण उपाय आहे, त्यामुळे जीबीएसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी केले आहे.
सोलापुरातील तरुणाचा आज जीबीएसमुळे मृत्यू झाला असून त्याला पुण्यात जीबीएसची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. त्याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर (Dr. Sanjeev Thakur) यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करताना वेळेत उपचार घ्या, असे सांगितले आहे.
डॉ. ठाकूर म्हणाले, तो अंदाजे चाळीस वर्षांचा रुग्ण होता. खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर आमच्याकडे पोस्टमार्टमसाठी आणला होता. शवविछेदन ज्या डॉक्टरांनी केलं, त्यांच्या प्राथमिक अहवालनुसार या रुग्णाचा मृत्यू जीबीएस (GBS) मुळे झाला आहे. पण, 100 टक्के खात्रीसाठी मेंदूतील, रक्ताचे नमुने, छोटे आणि मोठ्या आतड्याचे नमुने हे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याच्या तपासणीचे अहवाल हे 8 दिवसात प्राप्त होईल, त्यावेळी gbs मुळे मृत्यू आहे का हे निश्चित होईल, पण प्राथमिकदृष्ट्या gbs वाटतं आहे.
त्या रुग्णाचे दोन्ही हात आणि पाय निकामे झाले होते. श्वास घ्यायला त्रास होतं होता, त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मृतदेह पहिल्यानंतर जे डॉक्टरांना दिसलं त्यावरून प्राथमिकदृष्ट्या त्याचा मृत्यू gbs मुळेच झालाख असं दिसतंय. पण, कन्फर्म करण्यासाठी सॅम्पल पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत, असेही ठाकूर यांनी स्पष्ट केले.
रुग्णांच्या सोबत असलेल्या लोकांच्या आयसोलेशन बाबतीत काही माहिती उपलब्ध नाही. वेळेत उपचार मिळाले नाहीत तरच रुग्ण दगवू शकतो; अन्यथा जास्तीत जास्त रुग्णांना काही होत नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केले आहे.
जीबीएस या आजारामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. पण शिळे अन्न, उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका. पोटाचा काही त्रास होत असेल, त्यात हातपायचे त्राण गेले असं वाटतं असेल, तर तातडीने डॉक्टराना दाखवा, असे आवाहन डॉ. संजीव ठाकूर यांनी केले आहे.
Edited By Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.